नगर - माँ जिजाऊचे माहेर सिंधखेड येथून माँ सावित्रीबाईंचे माहेर नायगाव (सातारा) येथे सावित्रीबाई फुले स्मृतीज्योत सोहळ्याचे आयोज...
नगर - माँ जिजाऊचे माहेर सिंधखेड येथून माँ सावित्रीबाईंचे माहेर नायगाव (सातारा) येथे सावित्रीबाई
फुले स्मृतीज्योत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सावित्री सृष्टी प्रकल्प, बहुजनांचे शक्तीपीठ, ज्ञानपीठ, विद्यापीठ आणि भव्य सावित्री स्मारक झाले पाहिजे. यासाठी देशव्यापी जनजागृती, जनप्रबोधन, स्मृतीज्योत सावित्रीबाईच्या दारी हे अभियान राबविण्यात येत आहे. अशी माहिती अभियानाचे दीपक ठाकरे यांनी दिली.
सावित्रीबाई फुले स्मृतिज्योत सोहळा 2016 चे नगर येथे आगमन झाले असता, सावता परिषदेच्या वतीने संदिप कर्डिले यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अमोल धाडगे, दीपक ठाकरे, निखील शेलार, सोपार खरात, छगन मेहेत्रे, संतोष खंडेराव, परमेश्वर मेहेत्रे, संजय मेहेत्रे, अण्णा कचरे, ईश्वर गाडळकर, आकाश धाडगे, रवी भोजने, शरद गायकवाड, सुभाष शिंदे, अविनाश शिंदे, सुशांत गवळी, गणेश धाडगे, केलास शेलार आदि उपस्थित होते.
दीपक ठाकरे म्हणाले की, सावित्रीबाई जन्मगाव नायगाव (जिल्हा सातारा) येथे सावित्री सृष्टी हा प्रकल्प उभारावा. तेथे सावित्रीबाई व महात्मा फुलेंचे स्मारक, ग्रंथालय, वस्तु संग्रहालय व्हावे, सावित्री सृष्टी अंतर्गत जैव विविधता पार्क असावे. तेथे 1 ली ते उच्चशिक्षण मिळवण्याची सुविधा निर्माण व्हावी, यासाठी आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करीत आहेत. राज्यमंत्र्यांची समिती नेमून हे प्रश्न मार्गी लावावे. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन या प्रकल्पा ठिकाणी स्तंभामध्ये कायमस्वरुपी लावण्यात यावा, असे ते म्हणाले.









