नगर - जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अनिल कवडे यां...
नगर - जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी शनिवारी दिला.
जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, सहायक नियोजन अधिकारी एस. बी. व्हरसाळे, उमेश सूर्यवंशी, एकात्मिक आदिवासी विकासचे प्रकल्प अधिकारी राजेंद्र देशमुख यावेळी उपस्थित होते. कवडे म्हणाले, वार्षित योजनेंतर्गत करण्यात येणारी कामे दर्जेदार वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. जिल्हा वार्षिक योजना, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, खासदार स्थानिक विकास कार्यक्रम, डोंगरी विकास कार्यक्रम, अनुसूचित जाती उपाययोजना, अनुसूचित जमाती उपाययोजना याबाबत बैठकीत आढावा घेण्यात आला. विविध कामांच्या संनियंत्रणासाठी विकसित करण्यात आलेल्या मोबाइल अॅप्लिकेशनबाबतचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले.










