Archive Pages Design$type=blogging

राशीनच्या पार्श्वनाथ पतसंस्थेत सव्वा चार कोटींचा अपहार

प्रतिनिधी - तालुक्यातील राशीन येथील पार्श्वनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत चार कोटी 27 लाख 68 हजार 705 रुपयांचा अपहार झाला ...



प्रतिनिधी - तालुक्यातील राशीन येथील पार्श्वनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत चार कोटी 27 लाख 68 हजार 705 रुपयांचा अपहार झाला असून, या प्रकरणी संस्थेचे सचिव प्रवीण बोधे यांच्याविरुद्ध कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अप्पर विशेष लेखा परीक्षक पंडित रामचंद्र आरणे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे राशीनसह कर्जत तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, हा विषय चर्चेचा झाला आहे. 

अप्पर विशेष लेखा परीक्षक पंडित रामचंद्र आरणे यांनी कर्जत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2014 या आर्थिक वर्षात पतसंस्थेचे लेखा परीक्षण करण्यात आले. लेखा परीक्षण करताना अपहाराची व्याप्ती मागील चार वर्ष आढळून आली. संस्थेचे कार्यकारी सचिव प्रवीण मधुकर बोधे (रा. राशीन, ता. कर्जत) याने रकमेचा स्वत:च्या फायद्यासाठी अपहार केला. चार कोटी 27 लाख 68 हजार 705 रुपये एवढी अपहाराची रक्कम आहे. सचिव प्रवीण बोधे याने त्याचा अधिकार वापरून मुदत ठेव खाती ज्यांना रकमा देय नाही, अशांना वेळोवेळी रकमा दिल्या असा देखावा निर्माण करून ३६ लाख 86 हजार 556 रुपयांचा अपहार केला. 

व्यक्तिगत बचत खात्यावर वेळोवेळी रकमा बचत खातेदाराने उचलल्या आहेत. असे रेकॉर्ड तयार करून, असा देखावा करून 1 कोटी 36 लाख 98 हजार 389 रुपयांचा अपहार केला. पावत्या ठेवीत 90 लाख 42 हजार 642 रुपयांचा अपहार केला. ठेवीदारांच्या रकमा स्वीकारल्या परंतू स्वीकारलेल्या रकमा संस्थेच्या हिशोबी न घेता. ठेव धारकांना ठेव पावती देऊन, संस्थेचे दायीत्व वाढविले व रक्कम 6 लाख 12 हजारांचा अपहार केला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या करंट खात्यामध्ये पैसे भरणे व पैसे काढून आणण्याचा अधिकार होता. त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून, जिल्हा बॅँकेच्या करंट खात्यामध्ये रकमा भरणा करण्यापोटी नेल्या. प्रत्यक्षात बँकेत न भरता 56 लाखांचा अपहार केला. तसेच याच खात्यातून रकमा काढल्या. परंतु संस्थेच्या हिशोबी न घेता त्यांनी या खात्यावर रक्कम 5 लाखांचा अपहार केला. युनियन बॅँक ऑफ इंडियाच्या राशीन शाखेत बचत खात्यामध्ये रकमा भरणे, रकमा काढणे असे अधिकार बोधे यांना होते. त्यांनी बचत खात्यातभरणा करण्यासाठी 4 लाख रुपये नेले. परंतु ते बॅँकेत न भरता अपहार केला. अशा एक ते अकरा मुद्यावरून सचिव प्रवीण बोधे यांनी पार्श्‍वनाथ ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्थेत 4 कोटी 27 लाख 68 हजार 705 रुपयांचा अपहार केला असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: राशीनच्या पार्श्वनाथ पतसंस्थेत सव्वा चार कोटींचा अपहार
राशीनच्या पार्श्वनाथ पतसंस्थेत सव्वा चार कोटींचा अपहार
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgULiEOQ_glNQ4M_fzE7PmXAP07drfdusuNwikSzybe6xquovt7M5UBctsz0EnVlj9VVka_cX_mAnKCM24pXJNDwQo6_QTdA9SXXeVvSiNWFKz2J5vHl8-69rpvxDGQkx_6yst3ivoHVtGT/s320/04.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgULiEOQ_glNQ4M_fzE7PmXAP07drfdusuNwikSzybe6xquovt7M5UBctsz0EnVlj9VVka_cX_mAnKCM24pXJNDwQo6_QTdA9SXXeVvSiNWFKz2J5vHl8-69rpvxDGQkx_6yst3ivoHVtGT/s72-c/04.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_39.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_39.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago