नगर- शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जिजामातेने सुसंस्काराबरोबरच साधु संताच्या गोष्टींचे महत्व सांगून स्वराज...
नगर- शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जिजामातेने सुसंस्काराबरोबरच साधु संताच्या गोष्टींचे महत्व सांगून स्वराज्याच्या लढ्यासाठी बळ दिले. शिवाजी महारांजामुळे मराठी भाषेला मायबोलीचा दर्जा मिळाला असे प्रतिपादन बाळासाहेब बारस्कर यांनी केले.
पाइपलाइन रोडवरील श्रीराम चौकात श्रीराम चौक मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले केवल त्यांची जयंती साजरी केली म्हणजे आपले कर्तव्य संपले असे न समजता त्यांचे कार्य व त्यांची कार्यपद्धती विचार प्रत्यक्षात आपल्या मनात आचारणात आणावी, असे आवाहन बारस्कर यांनी केले. यावेळी चौकातील जेष्ठ नागरीक उत्तम चेमटे, रमेश संत, नगरसेवक महेश तवले, संपत नलवडे, आर.एम.चव्हाण, राजू कर्डीले, दिनेश कुलकर्णी, अशोक कानडे, प्रविण घुगार्ंडे, अनिल गाडे, हरिभाऊ संत, सागर गायकवाड, रघुनाथ औटी, दिलीप दुतारे, आंधळे साहेब, कार्यकर्ते मोठ्या संस्थेने उपस्थित होते.










