Archive Pages Design$type=blogging

मागण्या मान्य करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल - गोविंद मोकाटे

सलगच्या दुष्काळी परिस्थितीमुळे अहमदनगर जिल्ह्यामधील भीषण दुष्काळ, पाणी टंचाई, चारा टंचाई असल्यामुळे चारा छावण्या सुरु करणे अत्यंत गर...


सलगच्या दुष्काळी परिस्थितीमुळे अहमदनगर जिल्ह्यामधील भीषण दुष्काळ, पाणी टंचाई, चारा टंचाई असल्यामुळे चारा छावण्या सुरु करणे अत्यंत गरजेचे आहे. यासंदर्भात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य गोविंद खंडू मोकाटे यांनी जल्हाधिकारी, जिल्हा कृषिअधिकारी व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केलेले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील एकूण परिस्थितीचा आढावा घेतला असता जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळ आहे. पिण्यासाठी पाणी, जनावारांना चारा, शेतीमध्ये उत्पन्न नाही त्यामुळे शेतकरी हैराण झालेला आहे. चारा आणि पाण्याअभावी आपली जनावरे कवडीमोल भावाने विकत आहे. त्यातच जलयुक्त शिवाय योजनेच्या सर्व निकषात बसत असून देखील जेऊर, इमामपूर, ससेवाडी या गावांना वगळून अन्याय करण्यात आला आहे. या गावांचा या योजनेत सहभाग व्हावा यासाठी 12/02/2016 रोजी रास्ता रोकोचे आयोजन केल्याचे एक निवेदन दिले होते. त्यावर तहसीलदार साहेब, तालुका कृषी अधिकारी व एम.आय़.डी.सी. पोलीस स्टेशन चे पी आय़ यांनी 11/02/2016 रोजी मिटिंग घेऊन आश्वासन दिले होते त्यामुळे आम्ही ते स्थगित केले होते. परंतु अद्यापही आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

जेऊर, इमामपूर, ससेवाडी गावांचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश करावा. चारा छावण्या सुरु कराव्यात अथवा जनावर निहाय अनुदान द्यावे आणि तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा तसेच नगर तालुक्यामध्ये गावोगावी छावण्या सुरु कराव्यात. या मुख्य मागण्यांसाठी गोविंद मोकाटे यांच्या नेतृत्ताखाली जेऊर, ता.जि.अहमदनगर येथे नगर औरंगाबाद रोड या महामार्गावर मंगळवार दि.29 मार्च 2016 रोजी सकाळी 8 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहनही या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: मागण्या मान्य करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल - गोविंद मोकाटे
मागण्या मान्य करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल - गोविंद मोकाटे
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgULiEOQ_glNQ4M_fzE7PmXAP07drfdusuNwikSzybe6xquovt7M5UBctsz0EnVlj9VVka_cX_mAnKCM24pXJNDwQo6_QTdA9SXXeVvSiNWFKz2J5vHl8-69rpvxDGQkx_6yst3ivoHVtGT/s320/04.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgULiEOQ_glNQ4M_fzE7PmXAP07drfdusuNwikSzybe6xquovt7M5UBctsz0EnVlj9VVka_cX_mAnKCM24pXJNDwQo6_QTdA9SXXeVvSiNWFKz2J5vHl8-69rpvxDGQkx_6yst3ivoHVtGT/s72-c/04.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_396.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_396.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago