श्रीगोंदा - सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भ्रष्ट पोलिस निरीक्षक शामकांत सोमवंशी यांना तातडीने निलंबीत करुन त्यांच्या मालमत्तेच...
श्रीगोंदा - सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भ्रष्ट पोलिस निरीक्षक शामकांत सोमवंशी यांना तातडीने निलंबीत करुन त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी रा.स.प.चे जिल्हाध्यक्ष साहेबराव रासकर यांनी तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन केले.
जि.प.चे माजी सदस्य अनिल ढवाळ यांनी यावेळी धरणे आंदोलनाला पाठींबा व्यक्त करुन तालुक्यात सर्वत्र सुरु असलेले अवैध व अनैतिक व्यावसायाकडे लक्ष वेधून या पोलिस अधिकाऱ्याने आपले हप्ते वाढवून या व्यवसायांना व व्यवसाय करणाऱ्यांना अभय दिले व गोरगरीब, मागासवर्गीयांवर अत्याचार चालू असून सवर्णांची पाठराखण करणाऱ्या या अधिकाऱ्याची तातडीने बदली करावी व त्याने जमा केलेल्या संपत्तीची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. तालुक्यातील तांदळी मधील अल्पवयीन मागासवर्गीय मुलीवरील अत्याचार व वडाळा येथील प्रकरणात पोलिस निरीक्षणाने पक्षपातीपणे घेतलेली भूमिका याचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी डी.एम.भालेराव, सुभाष शिंदे, जालींदर घोडके, अनुराधा ढवाळ आदींनी महिलांवरील अन्यायाबाबत सोमवंशी यांनी केलेल्या कायद्याच्या कारवाईबाबत धाक दाखवून जवाब बदलण्यास भाग पाडले असल्याचे सांगून व तालुक्यात सर्वच प्रक्षाचे अवैध व्यवसाय जोमाने सुरु असून त्यास अटकाव करण्यास असमर्थ ठरलेल्या वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याची त्वरीत बदली करुन चांगला निपक्षपाती अधिकारी देण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. नि.ना.तहसिलदार सिताराम आल्हाट व दुर्गे यांनी निवेदन देण्यात आले.
पहिल्या फोटोत धरणे आंदोलनात बोलतांना अनिल ढवाळ
दुसऱ्या फोटोत दहसिलदार सिताराम आल्हाट व इगे यांना निवेदन देतांना डी.एम.भालेराव, जानु घोडके, साहेबराव रासकर, अनुराधा ढवाळ जितेंद्र पितळे आदि.











