राज्याचे मा.उपमुख्यमंत्री व विद्यमान आमदार तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मा.छगनराव भुजबळ यांच्यावर ईडी व महाराष्ट्र शासनाने केलेली ...
राज्याचे मा.उपमुख्यमंत्री व विद्यमान आमदार तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मा.छगनराव भुजबळ यांच्यावर ईडी व महाराष्ट्र शासनाने केलेली कारवाई ही सुडबुध्दीनेच केलेली आहे. शासन आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असून बहुजन समाजाच्या नेतृत्वाला संपविण्याचा घाट या सरकारने घातलेला दिसून येतो.
मा.भुजबळ साहेबांवर महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. सदर प्रकरण हे न्याय प्रविष्ट आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने काल सुमारे 11 तास चौकशीचे नाटक करुन रात्री उशिरा भुजबळ साहेबांना अटक केली ही गोष्ट हास्यापद वाटते. यापुर्वी समीर भुजबल यांनाही अटक केलेली असून त्यांचा मुलगा पंकज भुजबळ यांचे पासपोर्ट जमा केले आहे अशा प्रकारे सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे.
मा.ना.श्री.शरद पवार साहेब यांच्या आदेशाने राष्ट्रवादी जरी रस्त्यावर उतरणार नसली तरी या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. आमचा भारतीय संविधान व न्याय पालिकेवर पूर्णतः विश्वास आहे. शासनाने वैयक्तीत आकस बाजूला ठेवून मा.भुजबळ साहेबांना त्वरीत सोडून द्यावे अशी अपेक्षा बागळतो. अशा आशयाचे पत्र जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सचिव निलेश बांगरे यांनी शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांच्या सहीने देण्यात आले आहे.










