एच.व्ही.देसाई हॉस्पिटल, पुणे व के़डगाव येथील हरिहरेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठाण व जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक, अपंग, अनाथ, निराधार, मंचाच्...
एच.व्ही.देसाई हॉस्पिटल, पुणे व के़डगाव येथील हरिहरेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठाण व जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक, अपंग, अनाथ, निराधार, मंचाच्यावतीने प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ.चेमटे श्रीकांत यांनी सोमवार दि. 07 मार्च रोजी सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत महाशिवरात्रीनिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन स्वामी विवेकानंद चौक, भुषणनगर, केडगाव देवी, अहमदनगर येथे केले आहे. या शिबीरामध्ये एच.व्ही.देसाई हॉस्पिटल पुणे येथील तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करुन डोळ्यांच्या समस्यावर योग्य मार्गदर्शन व औषधोपचार केले जाणार आहेत. तसेच चष्म्याचा अचुक नंबर काढून दिला जाईल व रुग्णांची रक्तातील साखर व रक्तदाब तपासणी करुन मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड केली जाणार आहे व मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड केलेल्या रुग्णांना शिबिराच्या ठिकाणापासून, मोफत प्रवास, राहण्याची, जेवण्याची तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर काळा गॉगल मोफत तसेच बिनटाक्याची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करुन चांगल्या प्रतीचे लेन्स वापरले जाणार आहेत. तरी परिसरातील गरजू नागरिकांनी व नेत्र रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.
तरी नाव नोंदणीसाठी मो.नं.9325108057, 8421286709 या नंबरवर संपर्क साधावा असे आव्हान प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.चेमटे श्रीकांत यांनी केले आहे.










