नगर - निरंकारी बाबांचे परमशिष्य, केंद्रीय प्रचारक दिल्ली निवासी पंडीत मोहंमद गर्फेंर खान यांचे आध्यात्मिक प्रवचन व सत्संग कार्यक्रमाचे...
नगर - निरंकारी बाबांचे परमशिष्य, केंद्रीय प्रचारक दिल्ली निवासी पंडीत मोहंमद गर्फेंर खान यांचे आध्यात्मिक प्रवचन व सत्संग कार्यक्रमाचे निरंकारी मंडळाच्या नगर शाखेर्तेर्फे आयोजन केले असून बुधवार दि.30 मार्च रोजी सयंकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत जॉंगिग पार्क ग्राऊंड, मिस्किन रोड येथे त्यांचा प्रमुख उपस्थितीत सत्संग व प्रवचनांचा कार्यक्रम होईल.पंडीत गर्फेंर खान हे भगवद् गीता, कुराण, रामायण आदि धर्मग्रथांचे गाढे अभ्यासक असून 42 वर्षापासून निरंकरी मिशन चे केंद्रीय प्रचारक तसेच ज्ञान प्रचारक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी रामायण विद्यापीठ विराट हिंदू समाज (दिल्ली) यांजकडून ‘गीता’ वरील अध्ययन बदल ‘पंडीत’ ही पदवी देवुन सन्मानित केले. तसेच विश्वधर्म संसद (नेपाळ) कडून त्यांना ‘महात्मा’ पदीव प्रदान करुन विश्वधर्म संसदचे सदस्य म्हणून घोषित केले. तसेच दिल्ली येथील परा विद्यालयाकडून त्यांना ‘योग विभूती’ ही पदवी प्रदान करण्यात आली.पं.गर्फेर खान जी सद्या मराठवाडा व प.महाराष्ट्रात एक महिन्याच्या प्रचार यात्रेवर आले असून ठिक ठिकाणी सत्संग कार्यक्रमात प्रवचनांतून ते निरंकारी बाबाजींचा समस्त मानव मात्राच्या कल्याणाचा पावन संदेश देत असून मानवी जीवनाचे उद्धीष्ट, निराकार प्रभू रमात्माची ओळख, सदगुरुची मानवी जीवनात आवशकता, ब्रह्मज्ञान आदि विषयांवर सुमधुर, सरलवाणी व्दारे भाविकांना मार्गदर्शन करीत आहेत. बीड व जामखेड येथील कार्यक्रमानंतर त्यांचे दि.30 रोजी दुपारी नगरला आगमन होईल. येथील कार्यक्रमानंतर त्यांचे नगर जिल्ह्यात राजूर, अकोला, संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूर, सोनई, नेवासा या ठिकाणी सत्संग प्रवचनांचे कार्यक्रम होतील. पंडीत मोहमद गर्फेर खान हे प्रथमच नगरला येत असून नगरवासियांनी ही संधी दवडू नये व मोठ्या संख्येने उपस्थित राहून सत्संग व प्रचवनांचा लाभ घ्यावा. अशी माहिती अहमदनगर विभागीय प्रमुख हरीषजी खुबचंदानी दिली.










