नगर - जिल्ह्यात तालुकानिहाय उपलब्ध चाऱ्याचा फेरआढावा घेण्यात येणार आहे. त्यानुसार आठ दिवसांत आढावा घेऊन तसा अहवाल शासनाला सादर करण्यात...
नगर - जिल्ह्यात तालुकानिहाय उपलब्ध चाऱ्याचा फेरआढावा घेण्यात येणार आहे. त्यानुसार आठ दिवसांत आढावा घेऊन तसा अहवाल शासनाला सादर करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड सर्व विषय समिती सभापती यांच्या शिष्टमंडळाला दिले.
"दिव्य मराठी'ने २३ फेब्रुवारी रोजी "भरपूर चारा असल्याचा प्रशासनाचा जावईशोध' या मथळयाखाली वृत्त प्रकाशित केले होते. या अहवालाचा परिणाम जिल्ह्यात छावण्या सुरू करायच्या किंवा नाही या राज्य शासनाच्या निर्णयावर होणार होता. या वृत्तानंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला दिलेला चारा अहवाल हा दुष्काळी परिस्थितीशी विसंगत असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी मंत्री बबनराव पाचपुते सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केली होती. या विषयावर जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी स्थायी समितीची सभा घेण्याची विनंती जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड यांना केली होती. त्यानुसार तातडीने २९ फेब्रुवारी रोजी स्थायी समितीची सभा ण्यात आली.
यावेळी सर्वच सदस्यांनी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने जिल्हा प्रशासनाकडे जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे जो चारा अहवाल पाठवला तो दुष्काळी परिस्थिती विसंगत असल्याचे सांगितले. स्थायी समितीच्या बैठकीत पाठवलेला चारा अहवाल फेटाळण्यात आला नव्याने पुन्हा पाहणी करत तालुका गटनिहाय चारा अहवाल मांडण्याच्या सूचना पशुसंवर्धन कृषी विभागाला करण्यात आल्या. त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी तातडीने जिल्हाधिकारी कवडे यांची भेट घेत प्रशासनाने राज्य शासनाला पाठवलेला चारा अहवाल हा दुष्काळी परिस्थितीशी विसंगत आहे. यामुळे जिल्ह्यात छावण्या सुरू करण्याच्या निर्णयावर परिणाम होणार असल्याचे सांगितले.
शासनाला नूतन अहवाल पाठवणार
आठ दिवसांत गटनिहाय तालुकानिहाय जनावरे संख्या, उपलब्ध हिरवा चारा, वाळलेला चारा यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी विभाग पशुसंवर्धन विभागाला दिले. नव्याने येणारा पाहणी अहवाल राज्य शासनाला पुन्हा पाठवला जाईल, असे जिल्हाधिकारी कवडे यांनी जिल्हा परिषदेच्या शिष्टमंडळाला सांगितले.
फळबागांचे पंचनामे करा - पाण्याचा तुटवडा असतानाही शेतकरी टँकरने पाणी घालत फळबागा जगवत आहोत. गारपिटीने फळे जखमी झाली आहेत. गळाली नसली तरी मुका मार मोठ्या प्रमाणात आहे. ही फळे वरून चांगली दिसत असली तरी आतून जखमी आहेत. या जखमांचे परिणाम येणाऱ्या काही दिवसांत दिसतील. आताच काही फळांतून रस बाहर पडत आहे. येत्या काही दिवसांत ही फळे खराबच होणार आहेत. याचे प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.










