नगर- अरुणोदय गो-शाळेच्यावतीने आ.अरुण जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविण्यात आले. ग्रामदैवत विशाल गणेश मंदिरात ...
नगर- अरुणोदय गो-शाळेच्यावतीने आ.अरुण जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविण्यात आले. ग्रामदैवत विशाल गणेश मंदिरात तीन दिवसाचा गणेश याग करण्यात आला. तसेच हनुमान चालिसा व भक्ती गितांचा कार्यक्रमही घेण्यात आला. तसेच प्रसिद्ध व्याख्यात्या अपर्णा रामतीर्थनकर यांचे ‘आजची कुटूंब व्यवस्था’ या विषयावर आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रांगणात व्याख्यान झाले.
यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सौ.पार्वती जगताप, उपमहापौर सुवर्णा कोतकर, निर्मला मालपाणी, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे, ह.भ.प.प्रभा भोंग, अॅड.शारदा लगड, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती नसीम शेख, सुवर्णा जगताप, नगरसेविका शितल जगताप, मंगला गुंदेचा, आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संगीता निंबाळकर, वैशाली ससे, यांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले. यावेळी आ.संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, शहर बँकेचे अध्यक्ष डॉ.विजय भंडारी, संयोजक मनिष फुलडहाळे आदिंसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










