नगर- तालुक्यातील निमगाव वाघा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सुनिल कापसे व व्हा.चेअरमनपदी पै.नाना डोंगरे यांच...
नगर- तालुक्यातील निमगाव वाघा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सुनिल कापसे व व्हा.चेअरमनपदी पै.नाना डोंगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुनिल कापसे यांच्या नावाची सुचना अनिल फलके यांनी केली. त्यास संतोष फलके यांनी अनुमोदन दिले. तर पै.नाना डोंगरे यांच्या नावाची सुचना साहेबराव बोडखे यांनी केली. त्यास लहु गायकवाड यांनी अनुमोदन दिले.
नुतन चेअरमन, व्हा.चेअरमन यांचा उद्योजक संतोष कापसे, सोसायटीचे माजी चेअरमन सुरेश जाधव व अरुण कापसे यांनी फेटा बांधून व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून संस्थेचे सचिव विजय सोनवणे यांनी काम पाहिले. यावेळी संचालक शिवाजी फलके, सौ.द्रोपदाबाई कापसे, सौ.आशाबाई ठाणगे, मच्छिंद्र जाधव, आरुण काळे, अण्णा जाधव, भरत फलके आदी उपस्थित होते.
या निवडबद्दल सुनिल कापसे व पै.नाना डोंगरे यांचे आरुण फलके, गोकुळ जाधव, भरत बोडखे, मच्छिंद्र कापसे, सौ. लता फलके, चॉंदभाई शेख, नबाब शेख, भानुदास कापसे, दिलीप जाधव, ऍड.दिपक गायकवाड, संजय कापसे, बाळासाहेब गायकवाड, मंच्छिद्र डोंगरे, महादेव जाधव, लक्ष्मण चौरे आदींनी अभिनंदन केले आहे.










