टाकळी ढोकेश्वर येथील निवासी मतिमंद विद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना अनिस शेख. व्यासपीठावर मारुती कदम, रियाज तांबट आदी. अहमदनग...
टाकळी ढोकेश्वर येथील निवासी मतिमंद विद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना अनिस शेख. व्यासपीठावर मारुती कदम, रियाज तांबट आदी. अहमदनगर : आजच्या काळात एक मूल सांभाळणे अवघड आहे. अशा परिस्थितीत ढाकळी ढोकेश्वर येथील निवासी मतिमंद विद्यालयात ५00 अपंग,
निराधार आणि मतिमंद मुलांचा सांभाळ करण्यात येत आहे. त्यांना योग्य शिक्षणही देण्यात येत आहे, ही बाब कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन भारतीय ईनॉरिटीज सुरक्षा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मारुती कदम यांनी केले.
महासंघाचे संस्थापक दिवंगत मस्तान मिर्जा यांच्या जयंतीनिमित्त टाकळी ढोकेश्वर येथील निवासी मतिमंद विद्यालयात मुलांना खाऊ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी कदम बोलत होते. यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिस शेख, युवा जिल्हाध्यक्ष रियाज तांबट, मनसे सरचिटणीस संतोष कदम, हिंदू मजूर किसान पंचायतचे महादेव कांबळे, लेखक-साहित्यिक बी. एस. कांबळे, साजीद शेख, राम इंगळे, कार्यवाहक सलीम शेख, अंकुश भोरे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक शिक्षक हाडवळे यांनी केले. ढाकळी ढोकेश्वर येथील निवासी मतिमंद विद्यालयात सध्या पुणे, अहमदनगर, बीड, मुंबई आणि नाशिक जिल्ह्यातील मुले आहेत.










