नगर - संगीताचे शिक्षण घेत असलेल्यांसाठी, तसेच गायन क्षेत्रात व आवाजाशी संबंधित क्षेत्रात काम करू इच्छिणार्यांकरिता स्वरबहार प्रॉडशन्सच...
नगर - संगीताचे शिक्षण घेत असलेल्यांसाठी, तसेच गायन क्षेत्रात व आवाजाशी संबंधित क्षेत्रात काम करू इच्छिणार्यांकरिता स्वरबहार प्रॉडशन्सच्या वतीने र्मोेंत आवाज चिकित्सा शिबिराचे रविवार, दि. 6 मार्च 2016 रोजी आरटीओ स्टुडिओ, घुमरे गल्ली, आझाद चौक, अ.नगर येथे आयोजन करण्यात आले आहे, असे श्री. ओंकार टाक यांनी कळविले आहे.
सकाळी 11 ते 2 या वेळेत हे शिबिर संपन्न होईल. शिबिरात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून, अधिक माहितीसाठी 9595215100 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. गायन, निवेदन क्षेत्रात काम करू इच्छिणार्यांकरिता हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी वयाची अट नाही. व्हॉईस टेस्ट ही या क्षेत्रातील सर्वांत महत्त्वाची पायरी मानली जात असून, आवाज चिकित्सा ही सुविधा प्रथमच नगर शहरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. हौशी बालकलाकारांकरिता हे शिबिर म्हणजे ही खर्या अर्थाने सुवर्णसंधी आहे. या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.










