नगर - नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा मिळवून देणे हे आपण आपले कर्तव्य मानतो. त्यासाठी नियमितपणे कामाचा पाठपुरावा करीत एक एक कामे सुरु ह...
नगर - नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा मिळवून देणे हे आपण आपले कर्तव्य मानतो. त्यासाठी नियमितपणे कामाचा पाठपुरावा करीत एक एक कामे सुरु होत आहेत. नागापूरमधील बंद पाईप गटारीचे प्रश्न मार्गी लागला असून, रस्त्याचे कामही तातडीने सुरु करण्यात येईल. मनपा स्थानिक विकास निधीबरोबरच इतर निधीतून कामे पूर्ण करण्याचा प्रय़त्न आहे असे प्रतिपादन नगरसेवक डॉ.सागर बोरुडे यांनी केले.
प्रभाग 4 मधील नागापूरमध्ये नगरसेवक डॉ.सागर बोरुडे यांच्या प्रय़त्नातून बंद पाईप गटारीच्या कामाचा शुभारंभ हभप अजयमहाराज बारस्कर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्रवीण बारस्कर, किरण कातोरे, किशोर भोर, चंदू काळे, जॉन भाकरे, राजू शेख, भीमा कातोरे, सचिन भोर, नवनाथ शेख, विकास काळे, जावेद शेख, मुस्तकीन शेख, सुनील दारकुंडे, दिनेश वाघ, सूरज पाचारणे, तुषार शिदोरे, शांताराम उपस्थित होते.










