मुंबई - राज्यातीलपत्रकार त्यांच्या कुटुंबियांना जीवनदायी आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. या योजनेसाठ...
मुंबई - राज्यातीलपत्रकार त्यांच्या कुटुंबियांना जीवनदायी आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. या योजनेसाठी पत्रकारांना विशेष आरोग्यपत्र दिले जाईल, असे अाश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साेमवारी दिले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांसाेबत झालेल्या बैठकीत ते बाेलत हाेते. राजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव सुमित मलिक, माहिती जनसंपर्क विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, महासंचालक चंद्रशेखर ओक अादी उपस्थित हाेते.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'पत्रकारांसह त्यांच्या कुटुंबियांचाही राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंत समावेश करण्याबाबत कार्यवाही सुरु अाहे. याबाबत पुढील महिन्यात निर्णय होईल. पत्रकारांना मुंबईत घरे उपलब्ध करुन देण्याबाबत सिडको, म्हाडा यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल. तसेच पेन्शन लागू करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून त्याबाबतही कार्यवाही सुरु अाहे. शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमध्ये पाच कोटी रुपयांचा निधी वाढवून देण्याची वार्ताहर संघाची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली.
भाैमीक यांना लाखाची मदत ठाणेजिल्ह्यातील कासारवडवली येथे झालेल्या दुर्घटनेचे चित्रिकरण करताना मृत्यू झालेल्या वृत्तवाहिनीचे कॅमेरामन भौमीक यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून एक लाख रुपयांची मदत देण्याची मागणीदेखील मुख्यमंत्र्यांनी मान्य केली.










