नगर - मुलांचे भवितव्य हे बऱ्यापैकी त्यांच्या शिक्षणावर अवलंबून असते. शाळांना आयएसओ मानांकन देतानाचे विविध निकष आहेत. यामध्ये स्वच्...
नगर - मुलांचे भवितव्य हे बऱ्यापैकी त्यांच्या शिक्षणावर अवलंबून असते. शाळांना आयएसओ मानांकन देतानाचे विविध निकष आहेत. यामध्ये स्वच्छता, संगणक प्रशिक्षण, पिण्याच्या पाण्याची सोय, गांडुळ खत, वृक्षारोपण आदी निकष आहेत. या निकषांबरोबरच विद्यार्थ्यांची गुणवत्तेचाही गांभीर्याने विचार करुन मानांकन दिले पाहिजे. कारण हा निकष लावल्यास शाळांमध्ये इतर सुधारणा तर होतीलच, शिवाय गुणवत्ताही चांगल्या प्रकारे वाढून भावी पिढी सक्षम निर्माण होऊ शकेल. खासगी शाळांचे प्रमाण ग्रामीण भागात वाढत असून, जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढली पाहिजे. गुणवत्ता वाढल्यास कितीही मोठ्या संख्येने खासगी शाळा सुरु झाल्यास त्याचा काहीही फरक पडणार नाही, असे प्रतिपादन एमपीएसटीचे उपसंचालक पवार यांनी केले.
जि.प.उच्च प्राथ. शाळा, मुकुंदनगर, कडा कॉलनी, नेवासा फाटा शाळेस आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. हे प्रमाणपत्र एमपीएसटीचे उपसंचालक पवार यांच्या हस्ते मुख्याध्यापिका विमल निकम यांनी स्वीकारले. यावेळी श्री.पवार बोलत होते. याप्रसंगी शिक्षणाधिकारी अशोक कडुस, सौ.पठारे, त्रिंबक कांबळे, संजय धामणे, अंतोन पवार, गुलाब सय्यद, मीनाक्षी औचारे, नामदेव धामणे, विजय सरोदे, ज्योती बनकर, भारती काकडे, अलका शिदोरे आदी उपस्थित होते.










