नवी दिल्ली - लवकरचतुम्ही घरबसल्या बँकेतून पैसे काढू शकाल. जमा करणेही शक्य होणार आहे. तुमचे खाते कोणत्याही बँकेत असले तरीही हे शक्य ...
नवी दिल्ली - लवकरचतुम्ही घरबसल्या बँकेतून पैसे काढू शकाल. जमा करणेही शक्य होणार आहे. तुमचे खाते कोणत्याही बँकेत असले तरीही हे शक्य आहे. यासाठी मायक्रो एटीएम तुम्हाला घरपोच मिळेल.
या वर्षी २० हजार मायक्रो एटीएम पोस्टमनला दिले जातील, तर पुढच्या वर्षी मार्चपर्यंत देशभरात एकूण लाख ३० हजार मायक्रो एटीएम किंवा हँडहेल्ड डिव्हाइस उपलब्ध होतील. हे हाताने चालवता येतात. यांना चार्ज करण्यासाठी सौरऊर्जेचा वापर होतो. एकाच वेळी अनेक सेवा याद्वारे देता येतील. याविषयी या महिन्यातच आवश्यक ते निर्णय घेतले जातील. सप्टेंबरपर्यंत याची सुविधा मिळू लागेल.
डाक विभागाचा कायापालट करण्यासाठी केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी पुढाकार घेतला आहे. हे उपकरण हाताने सुरू करता येते. खेडोपाडी सुविधा देण्यासाठी याचा वापर होईल. सौरऊर्जेने चार्ज करता येणार असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. बँकांच्या सीबीएस प्रणालीशी हे संलग्न असेल. त्यामुळे पैसे काढणे जमा करणे शक्य होईल. यासाठी रिझर्व्ह बँक आण डाक विभागाची बैठक होणार आहे. बँकिंग अधिक सोपे करण्यासाठी याचा वापर होईल.
एटीएमच्या वापराप्रमाणे ग्राहकांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. व्यावसायिक लाभासाठी थेट डाक विभाग आणि बँकांदरम्यान करार होणार आहे. त्यामुळे बँकांचाही पैसा वाचणार आहे. त्यांना दुर्गम भागात एटीएम प्रणाली देण्याची गरज भासणार नाही. त्यासाठीचे संचालक, कर्मचारी, सुरक्षा रक्षक भरती करण्याची गरज नाही. त्यामुळे खर्चात कपात होईल. देशात लाख ५५ हजार पोस्ट ऑफिसेस आहेत. पैकी हजार पोस्ट ऑफिसांत मोठे एटीएम लावण्यात येतील, तर खेडोपाडी या हँडहेल्ड उपकरणाने एटीएम सेवा दिली जाईल. पोस्टमनला खास प्रशिक्षण दिले जाईल. घरी येणार एटीएम, पैसे काढू शकता, जमाही होतील.










