संरक्षणासाठी जे अंगरक्षक असतात ते मी सकाळी साडेपाच वाजता वॉकिंगला बाहेर जातो तेव्हा काही वेळ एकही अंगरक्षक नसतात, तर काही वेळेला म...
संरक्षणासाठी जे अंगरक्षक असतात ते मी सकाळी साडेपाच वाजता वॉकिंगला बाहेर जातो तेव्हा काही वेळ एकही अंगरक्षक नसतात, तर काही वेळेला मी बाहेर गेल्यानंतर पोलिसाने अंगरक्षकाला झोपेतून उठविलेले आहे. घाई गडबडीत उठल्यामळे पायात चप्पल, बूट नसलेले अणवाणी अंगरक्षक मी पाहिले आहेत. जे पोलिस संरक्षणासाठी ठेवलेले आहेत ते मी सकाळी जेव्हा योगासने करत असतो तेव्हा त्यातील काही पोलिस कर्मचारी माझ्या समोरच खुर्चींमध्ये बसून आपल्या मोबाईलवर एवढे गढून गेलेले असतात की, मारणारे मला मारून कधी जातील हे कळणारसुद्धा नाही. राळेगणसिद्धी मध्ये दोन पोलिस गाड्या रात्रंदिवस उभ्या असताना गाडीमध्ये काही वेळेला काही अंगरक्षक झोपलले असतात. या पोलिस संरक्षणावर देखरेख करण्यासाठी एक सुपरवायझर नेमलेले आहेत, हे मला २ मार्च २0१६ रोजी समजले तोपर्यंत त्यांनी मी कधीही पाहिले नाही.
मरणाची भीती नसल्याने मला शासनाने दिलेले पोलिस संरक्षण काढून घेण्याचे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोबत असलेल्या पोलिस सुरक्षा यंत्रणोचा पंचनामा करत पोलिस सुरक्षा निकामी असल्याचे म्हटले आहे. मरणाची भीती नसल्याने मला शासनाने दिलेले पोलिस संरक्षण काढून घ्यावे व माझ्या सुरक्षेपेक्षा जनसामान्यांकरीता ही सुरक्षा यंत्रणा वापरण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात 'अण्णा हजारे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ' या ५ मार्चच्या वर्तमान पत्रांतील बातमी वाचून दु:ख झाले. वयाच्या २६ व्यावर्षीच जो पर्यंत जगेल, तोपर्यंत माझे गाव, समाज आणि देशाची सेवा करील आणि ज्या दिवशी मरेल, त्या दिवशी गाव, समाज आणि देशाची सेवा करता करताच मरेल हे व्रत घेतले. समाज व देशाची सेवा करण्यामध्ये बाधा येऊ नये म्हणून अविवाहित राहून जीवनाचा प्रत्येक क्षण गाव, समाज आणि देश सेवेत लावण्याचा निर्णय घेतला.आज वयाच्या 78 व्या वर्षापर्यंत ईश्वराने अखंडपणो सेवा करून घेतली आहे. अशा प्रकारची निष्काम वृत्तीने समाज व देशाची सेवा करत असताना काही समाजकंटक, स्वार्थी लोकांचा स्वार्थ दुखावला गेल्याने या लोकांकडून मला जीवे मारण्याची धमक्या देत आहेत. अशा धमक्या वारंवार येत असल्याने माझ्या संरक्षणात गृहखात्याकडून वाढ केली जात आहे. 'मला संरक्षणाची गरज नसून माझे संरक्षण
काढून टाकावे म्हणून मी सरकाला पत्रे पाठविली. मात्र, माझ्या सरकार सुरक्षेत वाढ करीत आहे.सरकारच्या फक्त संरक्षणाने माझे मरण थांबेल का? इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनासुद्धा सरकार वाचवू शकले नाही तर माझ्यासारख्या मंदिरात राहणार्या माणसाचे काय? मला मारण्यासाठी काही वेळेला सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, ईश्वरकृपेने मी अद्यापही जिवंत आहे.
राळेगणसिद्धीसारख्या गावात 9 अंगरक्षक व 28 पोलिस कर्मचारी यांची सर्वांची राहण्याची व इतर सोय करणो सोपे काम नाही. प्रश्न फक्त अण्णा हजारे यांच्या संरक्षणाचा नाही तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदारीची जाणीव कमी होत चालली आहे, हा खरा प्रश्न असल्याचे अण्णांनी या पत्रकात म्हटले आहे. एका बाजूला राज्यामध्ये पुरेसे पोलिस कर्मचारी नसल्याने सुरक्षा व्यवस्थेवर ताण पडतो. जिथे गरज आहे तिथेच संरक्षण द्यावे. समाजाचा हा पैसा वाया चालला आहे. या राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे त्या राज्याला हे परवडणारे नाही, असे मला वाटते. मी माझे जीवनच समाज आणि राष्ट्रहितासाठी अर्पण केलेले असल्याने माझी शासनाने माझे संरक्षण वाढवू नये. माझ्या जीवनाचे काही कमी जास्त झाले तरी ती सर्वस्वी माझी जबाबदारी राहील. त्याचा दोष शासनावर राहणार नाही, शासन त्याला जबाबदार राहणार नाही. वयाच्या ७८ वर्षांपर्यंत कोणतीही सत्ता नाही, धन नाही, दौलत नाही तरीसुद्धा ईश्वराने जे काही थोडं फार काम करवून घेतलं. आता पुढील जीवन हे माझे बोनस जीवन समजून समाजसेवा करत राहणार आहे. भारत पाकिस्तान युद्धात खेमकरनच्या सीमेवर मरून गेल्यामुळे आता मला मरणाची भीती नाही, त्यामुळे संरक्षणाची गरज नाही.
दरम्यान, अण्णा हजारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सध्या असलेल्या अंगरक्ष सुरक्षा यंत्रणा व पोलिसांच्या कार्यपध्तीवर नाराजी व्यक्त करीत या यंत्रणोचा पंचनामा केला असून, राज्य सरकारला सुरक्षा यंत्रणा काढून घेण्याची विनंती केली आहे.










