नगर - येथील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकीची अद्ययावत शोधांची दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद नुकतीच संपन्न झाली. कार्यक्...
नगर - येथील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकीची अद्ययावत शोधांची दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद नुकतीच संपन्न झाली. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे अमरावती म्हणून अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.मोहन खेडकर उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पा. होत्या. यावेळी प्राचार्य डॉ.एच.एन.कुदळ, उपप्राचार्या डॉ.किशोर काळे, सेक्रेटरी (जन.) डॉ.सदानंद, डायरेक्टर (टेक्नि.) डॉ.पी.एल.गायकवाड आदि उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रिसेंट अॅडव्हांसेस इन मॅकेनिकल इंजिनिअरींग (आरएएमई 2016) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलतांना डॉ.खेडकर म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्चशिक्षित व्हावा या भावनेमधुन सहकारांच्या माध्यमातून पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटलांनी शैक्षणिक रोपटे लावून चळवळ सुरु केली. आज त्या रोपट्याचे वटवृक्षामध्ये रुपांतर झाल्याचे दिसून येत आहे.









