प्रतिनिधि - दरोड्यांच्या सत्रामुळे चोरांच्या कायम रडारवर असलेली अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक रविवारी पुन्हा याच कारणामुळे चर्चेत आ...
प्रतिनिधि - दरोड्यांच्या सत्रामुळे चोरांच्या कायम रडारवर असलेली अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक रविवारी पुन्हा याच कारणामुळे चर्चेत आली. बँकेची पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील शाखा फोडून चोरट्यांनी सुमारे ४४ लाख रुपयांची रक्कम लांबवली.
जिल्ह्यात अनेक वेळा जिल्हा बँकेतील शाखांवर दरोडा पडत असल्याने जिल्हा बँकेचे प्रशासन व संचालकांचे धाबे दणाणले असून, सातत्याने बँकेला लक्ष्य केले जात असल्याने ग्राहकही भांबावून गेले आहेत.
राळेगण थेरपाळ येथील घटना रविवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी बँकेला लक्ष्य केले. चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करीत इमारतीत प्रवेश केला. नंतर चोरट्यांनी गॅस कटरने तिजोरी फोडून सुमारे ४४ लाख ५६ हजार ९३५ रुपयांची रोख रक्कम लंपास केली. बँकेत झालेल्या चोरीचा पारनेर पोलिस पुढील तपास करत आहेत.
बँकांमध्ये सशस्त्र सुरक्षा गार्ड नेमणे गरजेचे सहकारी बँकांमध्ये सशस्त्र सुरक्षा रक्षकच नाहीत. त्यामुळे या बँकांच्या आणि कर्मचार्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत सहकारी बँकांमधील हजारो खातेदारांच्या ठेवी किती सुरक्षित आहेत, असा प्रश्न कोणालाही पडल्याशिवाय राहात नाही. अनेक शाखांत बंदूकधारी सुरक्षा गार्ड दिसून येत नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे सर्वच बँकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेण्याचे निर्देश असतानाही तालुक्यातील अनेक बँकांकडून त्याचे पालन होताना दिसत नाही.
तालुक्यातील सर्वच खासगी व सहकारी बँका सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत आहेत. मागील कही वषार्ंपासून तालुक्यात राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांची झपाट्याने वाढ होत आहे. राष्ट्रीय बँकांसोबतच सहकारी व खासगी बँकेच्या शाखा तालुक्यात सर्वत्र सुरू आहेत. या सर्वच बँका आधुनिक कार्यपद्धतीनुसार चालत असल्या, तरी सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे बँकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.










