Archive Pages Design$type=blogging

अधर्मावर धर्माने विजय विजय म्हणजेच होळी - जुगलकिशोर महाराज

नगर- राष्ट्रीय एकात्मतेसाठी नगरमध्ये काम करणार्‍या भारत भारती या सामाजिक संस्थेच्या वतीने होळी व धुलिवंदन निमित्त अनोख्या कार्यक्रमाचे ...

नगर- राष्ट्रीय एकात्मतेसाठी नगरमध्ये काम करणार्‍या भारत भारती या सामाजिक संस्थेच्या वतीने होळी व धुलिवंदन निमित्त अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. होळी सणाचे काय विशेषत: महत्व? होळी कशाकरीता साजरी करायची? यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारत भारतीचे सर्व सदस्य सहकुटूंब या अनोख्या उपक्रमात सहभागी झाले होते. भिंगारच्या राधा-गोविंद आश्रमाचे जुगलकिशोर महाराज यांचे होळी सणाचे आध्यात्मिक व शास्त्रीय महत्व सांगितले. यावेळी जुगलकिशोर महाराजांनी सर्वांवर पुष्पवृष्टी करुन अनोख्या होळीचा आनंद लुटला. 

भक्त प्रल्हाद हा धर्माचा रक्षणकर्ता होता, त्यामुळेच प्रत्येक वेळेस धर्मानेच त्यांचे प्राण वाचवले. होलिका राक्षसीनीच्या दहनामुळे अधर्मावर धर्माने विजय मिळून भक्त प्रल्हादचे प्राण वाचले. तेव्हा पासून होळी हा सण आनंदाचा उत्सव मानून रंगांची उधळण करण्याची परंपरा सुरु झाली आहे. हा अधर्मावर धर्माने मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा होत असतो. भारत भारती या सामाजिक संस्थेने होळी व धुलिवंदन निमित्त राबविलेला उपक्रम अत्यंत चांगला व कौतुकास्पद आहे. येणारा उन्हाळा अल्हाददायक वाटावा, यासाठी होळीनंतर गार पाण्याने स्नान करण्याची प्रथा आहे. आपल्या प्रत्येक सणाला धर्माचा व शास्त्राचा आधार आहे. आपल्या ऋषी-मुनींनी शास्त्राला धर्माचा आधार दिला आहे. 

यावेळी भारत भारतीचे नुतन अध्यक्ष अशोक मवाळ यांनी भारत भारतीचे नुतन कार्यकारिणी जाहीर केली. ती पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष - राजेंद्र अग्रवाल, सचिव- मिलिंद कुलकर्णी, सहसचिव-समीर बोरा, कोषाध्यक्ष-कौशिक कोठारी, सह कोषाध्यक्ष- हिरालाल पटेल, कार्यकारिणी सदस्य - राजू लक्ष्मण, सुरेंद्र सोनी, सुरेश रुगणवाल, दिनेश छाबरीया, राजेश पलाई, हरेश हिरवाणी, रामेश्वर बिहाणी, संघटक - राजेंद्र जोशी, वाल्मिक कुलकर्णी, संजय आडेप, सल्लागार - प्रदीप पंजाबी, के.के.शेट्टी, कॅप्टन आनंद रावत, चंद्रशेखर आरोळे.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: अधर्मावर धर्माने विजय विजय म्हणजेच होळी - जुगलकिशोर महाराज
अधर्मावर धर्माने विजय विजय म्हणजेच होळी - जुगलकिशोर महाराज
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg6ZoqYmaRU24CBOHtgEUiZTCaF4gTk7uzDJdKEU4D5mOIzeuFLKNdvousMXgZ77kkm5fmMF06QFbFVYr2zlrE3iTmWxn2d1RuuK3plNNAyx2Hn88OCKVGTyZKHp1fYjSHiyGlXAT0EEMQa/s320/4+x6-%253D--7.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg6ZoqYmaRU24CBOHtgEUiZTCaF4gTk7uzDJdKEU4D5mOIzeuFLKNdvousMXgZ77kkm5fmMF06QFbFVYr2zlrE3iTmWxn2d1RuuK3plNNAyx2Hn88OCKVGTyZKHp1fYjSHiyGlXAT0EEMQa/s72-c/4+x6-%253D--7.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_470.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_470.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago