नगर - केंद्र राज्य शासनाची एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी विकास योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना रमाई आवास योजनेअंतर...
नगर - केंद्र राज्य शासनाची एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी विकास योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना रमाई आवास योजनेअंतर्गत महापालिकेने दोन वर्षांपूर्वी घरकुलांचे तीन प्रकल्प हाती घेतले होते. शहराच्या प्रथम महिला माजी महापौर शीला शिंदे यांच्या कार्यकाळात हाती घेण्यात आलेला सातशे घरांचा महत्त्वाकांक्षी घरकुल प्रकल्प पूर्ण झाला आहे. तब्बल २० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाद्वारे झोपडपट्टीत राहणाऱ्या सातशे कुटुंबांचे पुनर्वसन होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (२२ मार्च) या घरकुलांचे लोकार्पण करण्यात येईल.
स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाला वाटते. पण अनेक आर्थिक अडचणींमुळे प्रत्येकाला ते शक्य नसते परंतु केंद्र राज्य शासनाने राबविलेल्या एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी विकास योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना रमाई आवास योजनेअंतर्गत महापालिकेने मारुती परिसरात २५२ ११३ घरकुलांचे दोन आणि काटवन खंडोबा परिसरात ३७२ घरकुलांचा एक अशा तीन प्रकल्पांचे काम आता पूर्ण झाले आहे. केंद्र राज्य शासनाकडून उपलब्ध झालेल्या २० कोटी रुपयांच्या निधीतून हे प्रकल्प उभे राहिले. महापालिका लाभार्थींची त्यात केवळ दहा टक्के रक्कम आहे. प्रत्येक कुटुंबाला २६९ चौरस फुटांचे सर्व सोयी-सुविधा असलेले प्रशस्त घर उपलब्ध झाले आहे.
माजी महापौर शीला शिंदे यांच्या कार्यकाळात घरकुलांचे हे महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू करण्यात आले. त्यांनी स्वत: या कामात लक्ष घातले. वेळोवेळी बैठका घेऊन, तसेच प्रत्यक्ष कामाची पाहणी करून लवकरात लवकर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आज त्यांच्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या मंगळवारी घरकुलांचे लोकार्पण होणार आहे.










