अहमदनगर - आज दि. २० रविवार रोजी सर्व चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी पाम संडे अर्थात झावळ्यांचा रविवार सण साजरा केला. यानिमित्त विशेष वि...
अहमदनगर - आज दि. २० रविवार रोजी सर्व चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी पाम संडे अर्थात झावळ्यांचा रविवार सण साजरा केला. यानिमित्त विशेष विधीचे आयोजन ख्रिस्ती मंदिरात करण्यात आले होते.
येशू ख्रिस्ताचा पवित्र येरुशलेमातील प्रवेश झाला तेव्हा तत्कालीन जनतेने झाडांच्या कोवळ्या डहाळ्या व आंगावरची वस्त्रे येशू ख्रिस्ताच्या पायाखाली आंदारली होती, त्याचे स्मरण म्हणून प्रतीवर्षी या दिवशी झावळ्या हातात घेऊन प्रदक्षिणा काढतात.
उद्या म्हणजे सोमवार पासून ख्रिस्ती बांधवांच्या पवित्र सप्ताहाला सुरुवात होत आहे.










