श्रीगोंदा - येथील सुफी संत शेख मंहमद बाबा यांच्या यात्रोत्सवानिमित्त आयोजीत काल्याच्या किर्तनात स्त्रीचे महत्व सांगितले. परमेश्वराने...
श्रीगोंदा - येथील सुफी संत शेख मंहमद बाबा यांच्या यात्रोत्सवानिमित्त आयोजीत काल्याच्या किर्तनात स्त्रीचे महत्व सांगितले. परमेश्वराने स्त्रिला महान बनवले आहे. तीचा आदर करावयास हवा. तीच्या उदरी जन्म घेऊनच अनेक संत बनले, महात्मे बनले ज्यांच्यामुळे स्वराज्य प्रस्थापीत झाले. आई-वडिलांना वृध्दाश्रमात पाठवू नका. मुलांना अनाथाश्रमात ठेवू नका त्यांना प्रेम द्या, माया द्या. आज स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढले आहे. भ्रूणहत्या करणे हे सर्वात मोठे पाप असल्याचे भागवताचार्य केशव महाराज उखळीकर यांनी या यात्रोत्सवात मार्गदर्शन करतांना उखळीवर बोलत होते. ते पुढे म्हणाले मुलीला गर्भातच मारले जाते ही फार वाईट गोष्ट आहे. त्यामुळे मुलांच्या जन्माच्या प्रमाणात मुलीचा जन्मदर कमी होत चालला आहे. तुम्हाला आई पाहिजे, बहिण पाहिजे, सुना पाहिजे मात्र मुलगी नको. मात्र याकडे दुर्लक्ष करत नकळत तुम्ही गर्भातच तीची हत्या करण्याचे पाप करत आहात. मग ही सर्व नाती तुम्हाला कशी मिळणार? मुलांना लग्नासाठी जोडीदार मिळणार नाही व निसर्गाचे संतुलन बिघडेल व हे प्रमाण घटल्याने सर्वत्र अत्याचार वाढतील. माणसे पशुपक्षीही हीन होतील त्यामुळे मुलीचा गर्भपात करु नका. बेटी वाचवा असा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमास ग्रामस्थ व परिसरातील बाबांचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.










