जिल्हा परिषदेने ग्रामपंचायत नोकर भरतीत पारदर्शकता आणावी असा निर्णय आयटक संलग्न ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या 14 फेब्रुवारी 2016 रोजी...
जिल्हा परिषदेने ग्रामपंचायत नोकर भरतीत पारदर्शकता आणावी असा निर्णय आयटक संलग्न ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या 14 फेब्रुवारी 2016 रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीत 10% भरती ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची असते. मात्र ग्रामपंचायतीतून प्रथम 23 आणि नंतर 26 कर्मचारी यांची नोकर भरतीसाठी जि.प.ग्रामपंचायत विभागाने तयार केलेल्या 26 जणांच्या यादीवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आक्षेप असल्याने यासंदर्भात लालबावटा आयटक संलग्न ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ.अॅड.सुधी टोकेकर आणि अॅड.सुभाष लांडे यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाची योग्य पध्दतीने चौकशी न झाल्यास कर्मचारी हायकोर्टात तक्रार करतील असा इशारा संघटनेचे उपाध्यक्ष संदीप आल्हाट, विष्णू वाघ, मारुती सावंत, रुई छत्रपतीचे पठारे यांनी दिला आहे.










