नगर - वाडिया पार्कच्या मैदानावर अ.नगर जिल्हा क्रिकेट असो. व मनपा यांच्या वतीने अहमदनगर प्रिमियर लिग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत सेमी ...
नगर - वाडिया पार्कच्या मैदानावर अ.नगर जिल्हा क्रिकेट असो. व मनपा यांच्या वतीने अहमदनगर प्रिमियर लिग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत सेमी फायनलमध्ये न्यू कमांडोज, सोहम सुपरकिंग्ज, क्वेरा चॅलेंजर्स, ईशवेद वॉरियर्स यांचा समावेश झाला असून, त्यांच्यातील लढत शनिवारी होणार होती. मात्र, भारत व पाकिस्तान यांच्यात 19 मार्चला सामना होत असून, त्यामुळे अहमदनगर प्रिमियर लिगला सुट्टी देण्यात आली आहे. सेमी फायनलचे दोन्ही सामने रविवारी (दि. 20) रोजी खेळविण्यात येणार आहेत व फायनलची मॅच सोमवार, दि. 21 मार्च रोजी होणार आहे.
ईशवेदचा कप्तान अनुपम संकलेचा याने आखलेले चक्रव्यूह भेदण्यात साईदीप अपयशी
साईदीप हिरोज व ईशवेद वॉरियर्स यांच्यात लढत झाली. यात साईदीप हिरोजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ईशवेद वॉरियर्सने 18 षटकांत 145 धावांचे आव्हान ठेवले. मात्र, हे आव्हान साईदीप हिरोज पेलू शकले नाहीत. त्यांचे 7 गडी अवघ्या 119 धावांवर गारद झाले.
साईदीप हिरोज व ईशवेद वॉरियर्स यांच्यात समान गुण झाले. त्यामुळे नेट रनरेटमध्ये ईशवेद वॉरियर्सने आघाडी घेतल्याने त्यांचा सेमी फायनलमधील प्रवेश निश्चित झाला.
ईशवेद वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करीत 18 षटकांत सर्व बाद 145 धावा केल्या. ईशवेदचा अनुपम संकलेचा 22, सौरभ शिंगवी 44, मोहसीन र्सैेंी 29, सौरभ मोरे याने 14 धावा केल्या. साईदीपच्या सिद्धार्थ भगत 44, राजू थोरात 35 धावा केल्या. त्यांचा खेळ 12 षटकांनंतर हळहळू डळमळत गेला. साईदीप 20 षटकांत केवळ 119 धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यामुळे ईशवेदचा 26 धावांनी विजय झाला. ईशवेदच्या अनुपम संकलेचा याने तयार केलेले चक्रव्युह भेदण्यात साईदीपला अपयश आले. अनुपम संकलेचा याने 4 षटकांत 1 मेडन षटक टाकून 5 धावा देऊन 1 विकेट घेतली. त्यामुळे ईशवेदचा विजय अधिक सुकर झाला. साईदीपचा पराभव होऊन जर त्यांनी 120 धावांपर्यंत मजल मारली असतील, तर ते सेमी फायनलमध्ये पोहोचले असते.










