Archive Pages Design$type=blogging

एक हजार बेकायदा नळजोड अधिकृत

अवघ्या हजार रुपयांत नळजोड अधिकृत करण्याची संधी  नगर - महापालिकाप्रशासनाने शहरातील बेकायदा नळजोड अधिकृत करण्याची मोहीम हाती घेतली आ...

अवघ्या हजार रुपयांत नळजोड अधिकृत करण्याची संधी 


नगर - महापालिकाप्रशासनाने शहरातील बेकायदा नळजोड अधिकृत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत तब्बल एक हजार ४५ नळजोड अधिकृत करण्यात आले आहेत. अवघे तीन हजार रुपये भरून बेकायदा नळजोड अधिकृत करण्याची संधी आयुक्त विलास ढगे यांनी उपलब्ध करून दिली आहे. त्यातून महापालिकेच्या तिजोरीत तब्बल ३० ते ३५ लाखांची रक्कम जमा झाली. बेकायदा नळजोड अधिकृत करणाऱ्यांचे नळजोड तोडण्यात येत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

शहरातील मालमत्तांची संख्या एक लाखापेक्षा अधिक असताना अधिकृत नळजोडांची संख्या मात्र अवघी ४८ हजार आहे. त्यावरूनच शहरात बेकायदा नळजोडांचा प्रश्न किती गंभीर आहे, ते स्पष्ट होते. शहराच्या विविध भागांत सुमारे ३० हजार बेकायदा नळजोड आहेत. झेंडीगेट भागात बेकायदा नळजोडांचे प्रमाण सर्वाधिक आहे. महापालिका प्रशासनाने आतापर्यंत हे बेकायदा नळजोड अधिकृत करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. आयुक्त ढगे यांनी मात्र बेकायदा नळजोड अधिकृत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एक हजार रुपये दंड दोन हजार रुपये रितसर शुल्क भरल्यानंतर मालमत्ताधारकांना बेकायदा नळजोड अधिकृत करता येतो. चारही प्रभाग समिती कार्यालयांमार्फत ही मोहीम राबवण्यात येत आहे. प्रभाग अधिकारी स्वत: बेकायदा नळांची पाहणी करून पंचनामा करत आहेत. बेकायदा नळजोड अधिकृत केल्यास नळजोड तोडण्याची कार्यवाही प्रभाग अधिकारी करत आहेत. 

सावेडीचे प्रभाग अधिकारी एस. बी. तडवी यांनी काही बेकायदा नळजोडधारकांच्या विरोधात थेट पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. त्यामुळे बेकायदा नळजोडधारकांचे धाबे दणाणले आहेत. सावेडी उपनगरात सर्वाधिक ३२० बेकायदा नळजोड अधिकृत करण्यात आले आहेत. शिवाय शंभरपेक्षा अधिक बेकायदा नळजोड तोडण्याची कारवाई तडवी यांनी केली आहे. शहर विभागाचे प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर यांनीदेखील दोनशेपेक्षा अधिक बेकायदा नळजोड अधिकृत केले आहेत. बुरूडगाव विभागाचे प्रभाग अधिकारी नाना गोसावी यांनी सुमारे अडीचशे बेकायदा नळजोड अधिकृत केले. चारही विभागांतर्गत ही कार्यवाही सुरू असून नळजोडधारकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत एक हजारपेक्षा अधिक नळजोड अधिकृत करण्यात आले आहेत. त्यातून महापालिकेच्या तिजोरीत तब्बल ३० ते ३५ लाख रुपयांची रक्कम जमा झाली आहे. 

नाममात्र दंड भरून मिळाली सवलत - बेकायदा नळजोडधारकांनी आतापर्यंत चोरून पाणी वापरले. वर्षानुवर्षे त्यांची ही चोरी सुरू आहे. परंतु आता त्यांना केवळ एक हजार रुपये दंड भरून बेकायदा नळजोड अधिकृत करता येत आहे. आतापर्यंत चोरून वापरलेल्या पाण्याचा दंड प्रशासनाने त्यांच्याकडून वसूल केलेला नाही. त्यामुळे नळजोड अधिकृत करण्याची चांगली संधी बेकायदा नळजोडधारकांना उपलब्ध झालेली आहे. सर्व प्रभाग अधिकारी देखील प्रभावीपणे मोहीम राबवत आहेत. त्यामुळे नळजोड अधिकृत करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. 
... खायचे दात वेगळे 
विविध भागातील हॉटेल व्यावसायिकांनी मनपाकडून िरतसर अर्धा इंच नळजोड घेतला असला, तरी प्रत्यक्षात मात्र एक ते दीड इंचाचा नळजोड घेऊन पाण्याची सर्रास चोरी सुरू आहे. व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा अनधिकृत नळजोड घेऊन पाण्याची चोरी करणाऱ्यांमध्ये व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. हॉटेल, वॉशिंग सेंटर, शोरूम यांच्यासह वेगवेगळे लहान- मोठे व्यवसाय करणाऱ्यांनी अनधिकृत नळजोड घेतले आहेत. हे व्यावसायिक आता प्रभाग अधिकाऱ्यांच्या रडारवर आहेत. बेकायदा नळजोड अधिकृत केल्यास व्यावसायिकांच्या विरोधात थेट पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात येत आहे. त्यामुळे चोरून पाणी वापरणाऱ्या या व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: एक हजार बेकायदा नळजोड अधिकृत
एक हजार बेकायदा नळजोड अधिकृत
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgApJRzU_p05q20nNtKFZ5wI0MgmdHlrAx-ea7o_MFgJFl_qLnZQ_YUgJsxGTyy7H3pUqpyqkCWYELMH7_IMFKOTmOkwNLvh9JoDmaRydwan2Y0mQI7CcPs8H9qQNvaNYkSfVYb6WZE4ZL6/s1600/Naljod.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgApJRzU_p05q20nNtKFZ5wI0MgmdHlrAx-ea7o_MFgJFl_qLnZQ_YUgJsxGTyy7H3pUqpyqkCWYELMH7_IMFKOTmOkwNLvh9JoDmaRydwan2Y0mQI7CcPs8H9qQNvaNYkSfVYb6WZE4ZL6/s72-c/Naljod.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_50.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_50.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago