अहमदनगर पहिली मंडळी कॉंग्रीगेशनल चर्चच्या ह्यूम मेमोरिअल चर्चमध्ये रविवारच्या उपासने दरम्यान चर्चच्या ट्रस्टवरील वर्चस्वावरुन ख्रिश्...
अहमदनगर पहिली मंडळी कॉंग्रीगेशनल चर्चच्या ह्यूम मेमोरिअल चर्चमध्ये रविवारच्या उपासने दरम्यान चर्चच्या ट्रस्टवरील वर्चस्वावरुन ख्रिश्चन समाजाच्या जॉन्सन शेक्सपिअर व डी.जी.भांबळ या दोन गटात झालेल्या वादाने चर्चमधील प्रेस्टिज हे पोलीस चौथऱ्यावर येऊन टेकले आहे. पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर यांनी कलम 112 व 117 अन्वये दोन्ही गटातील 16 जणांना या नोटीसा बजावल्या आहेत. यासंदर्भात न्यायालयास अहवाल पाठवला जाणार असल्याचेही मालकर यांनी सांगितले.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चर्चमधील रविवार सकाळच्या उपासनेत प्रार्थना कोणी करायची यावरुन वाद झाला. परिणामी पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला. तसा हा वाद पूर्वीपासूनच सुरु होता परंतु धर्मगुरु चंद्रकांत उजागरे यांच्या निधनानंतर हे वाद अधिक उफाळले. त्यातूनच हा प्रकार घडला.
सार्वजनिक प्रार्थनास्थळी धार्मिक प्रवचनासाठी जमलेल्या लोकांमध्ये गोंधळ घातल्याच्या कारणावरुन ज्या 16 जणांना या नोटीसा पाठविण्यात आले त्यांचे नावे पुढीलप्रमाणे - जॉन्सन शेक्सपिअर, सचिन जाधव, ज्युलकिन मिरपगार, जास्मिन शेक्सपिअर, रजनी प्रदीप मकासरे, रेणुका सुनील सोनवणे, ऑल्विन शेक्सपिअर, सुभाष शिंदे, सुनील भांबळ, सनी मिसाळ, संजय मिसाळ, नाना शिंदे, जॉय उर्फ आशिष लोखंडे, रुबेन त्रिभुवन व रवींद्र ठोंबरे.










