Archive Pages Design$type=blogging

'नुकसानग्रस्त पिके व फळबागांचे पंचनामे तातडीने करा'

अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर तालुक्यात रविवारी व सोमवारी वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस झाला. ही ठिकाणी तर गारांचा पाऊसही पडला. अवकाळी पाव...



अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर तालुक्यात रविवारी व सोमवारी वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस झाला. ही ठिकाणी तर गारांचा पाऊसही पडला. अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पिकांची त्याचप्रमाणे संत्रा, मोसंबी, डाळिंब आदि फळबागांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करुन शेतकर्‍यांना मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदचे सदस्य बाळासाहेब हराळ व भारतीय जनता पक्षाचे नगर तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी निवासी उपजिल्हाधकारी राजेंद्र पाटील यांच्याकडे केली आहे. श्री. पाटील यांना गणीचे निवदेन देण्यात आले आहे. तहसीलदार सुधीर पाटील यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी बाळासाहेब पोटघन, बबन कासार, कैलास भालसिंग, दादा बोठे आदि शेतकरी उपस्थित होते.

नगर तालु्क्याच्या अनेक ठिकाणी सोमवारी अवकाळी पावसाने कहर केला. एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे अवकाळी पावसाचा तडाखा अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे खरीप प्रमाणेच रब्बी पिकेही शेतकर्‍यांच्या पदरात पडली नाही. अगदी नगण्य प्रमाणात रब्बीचे पिके शेतात होती. हाता तोंडाशी आलेला तो घासही निसर्गाने हिरावून घेतला आहे. नोव्हेंबर, डिसेंबर २0१५ पासून शेतकरी फळबागांना टॅंकरद्वारे विकत पाणी घालत आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या फळबागा वाचविण्यासाठी शेतकरी झटत आहे. अनेक शेतकर्‍यांच्या फळबागा उद्वस्त झाल्या आहेत. काहींनी उसनवारी करत हजारो रुपये खर्च करुन फळबागा वाचविल्या आहेत. अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. एकतर फळांना बाजारभाव चांगला नाही, त्यातच अवकाळी पावसाचा फटका बसल्याने फळांचा जमिनीवर शेणसडा झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी वर्ग कमालीचा अडचणीत सापडला आहे. शासनाने तात्काळ नुकसानग्रस्त फळबाग व पिकांचे पंचनामे करुन तात्काळ मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: 'नुकसानग्रस्त पिके व फळबागांचे पंचनामे तातडीने करा'
'नुकसानग्रस्त पिके व फळबागांचे पंचनामे तातडीने करा'
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgvSWQmzEpzRIEvEAy8I-f0F76R_8pg3ugfuqt7RAASx_DDykedYGVR_dD4L0PdnRd7tb4XXdw_FHaoiEZs8bPSBmcF2YXLhwQWS7FIqoiIVQ-iwloSmiRjRFnnWG2VdyKmK4BIZF_NeRbe/s320/Nuksanrast.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgvSWQmzEpzRIEvEAy8I-f0F76R_8pg3ugfuqt7RAASx_DDykedYGVR_dD4L0PdnRd7tb4XXdw_FHaoiEZs8bPSBmcF2YXLhwQWS7FIqoiIVQ-iwloSmiRjRFnnWG2VdyKmK4BIZF_NeRbe/s72-c/Nuksanrast.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_51.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_51.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago