पारनेर - तालुक्यातील जवळे ग्रामपंचायत कार्यालयात जलजागृती कार्यक्रम नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी उपसरपंच किसन रासकर होते. पाणी टंचा...
पारनेर - तालुक्यातील जवळे ग्रामपंचायत कार्यालयात जलजागृती कार्यक्रम नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी उपसरपंच किसन रासकर होते. पाणी टंचाईची वाढती तीव्रता लक्षात घेऊन लोकसहभागातून बंधारे बांधण्याचे आवाहन कुकडीचे वाडेगव्हाण येथील शाखा अभियंता बापूसाहेब फुंदे यांनी केले.
बंधाऱ्याअभावी कुकडीचे पाणी वाहून जाते. त्यामुळे शासनाने जवळे परिसरात जलशिवारची कामे हाती घ्यावी तसेच ग्रामपंचायतीला टँकर मिळावे, अशी मागणी उपसरपंच रासकर यांनी केली. शिवाजी धोंडिबा सालके, प्रदीप सोमवंशी यांनी पाण्याअभावी नुकसान झालेले डाळींब, फळबागा व इतर पिकांचे पंचनामे करावे, अशी मागणी केली.
यावेळी सरपंच रत्नमाला शिंगाडे, संतोष पठारे, राळेगण थेरपाळचे सरपंच कैलास डोमे, आबाजी रासकर, बाळासाहेब दशरथ सालके, वाळके, शिरसाठ, शेतकरी, ग्रामस्थ हजर होते.










