नगर- अहमदनगर जिल्ह्यातील स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशिय संस्था, निमगांवा वाघा, ता.जि.अहमदनगर यांच्यावतीने एस.टी.बँक अ.नगर शाखेचे कर...
नगर- अहमदनगर जिल्ह्यातील स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशिय संस्था, निमगांवा वाघा, ता.जि.अहमदनगर यांच्यावतीने एस.टी.बँक अ.नगर शाखेचे कर्मचारी विजयकुमार विठ्ठलकुमार भालसिंग रा.वाळकी यांना ‘राज्यस्तरीय मराठा भुषण पुरस्कार’ जाहीर झाला असून तसे निवडीचे पत्र संस्थेचे अध्यक्ष पै.नानासाहेब डोंगरे यांनी नुकतेच दिले आहे. पुरस्काराचे वितरण शनिवार दि. 26 मार्च 2016 रोजी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त अनेक मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
विजयकुमार भालसिंग हे अत्यंत गरीब शेतकरी कुटूंबातील असून, त्यांनी एस.टी.बँकेची नोकरी सांभाळून आपल्या हलाखीच्या परिस्थितीत समाजाला हेवा वाटेल, असे अनेक महान कार्ये केले असून, अशा सच्या समाजसेवकचा चेहरा व त्यांचा दानशूरपणा आज जनतेपुढे यावा व त्यांनी समाजासाठी उल्लेखनिय कार्ये केल्याने त्यांना सदरचा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, विजयकुमार भालसिंग यांना आतापर्यंत सावित्रीज्योती गौरव पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, उमाजी नाईक शूरवीर पुरस्कार, ज्ञानमाऊली पुरस्कार, सामाजिक एकता शक्ती पुरस्कार, राष्ट्र सेवा पुरस्कार, अनाथ मुलांतर्फे गौरव पुरस्कार, रक्तदान शिबीर संयोजन केल्याने त्यांना पालिकेतर्फे गौरव पत्र देऊन सन्मानित केले ऊसन, एस.टी.बँक कर्मचार्यांपैकी व वाळकी पंचक्रोशित एवढे पुरस्कार मिळवणारा एकमेव समाजसवेक म्हटले तर वाव ठरणार नाही. विजयकुमार भालसिंग यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे वाळकी पंचक्रोशित व एस.टी.बँकेतील कर्मचारी व अधिकारी वर्गाकडून कौतुक होत आहे.










