Archive Pages Design$type=blogging

राहुरी तालुक्यात तरुणाचा मृतदेह... घातपाताची शक्यता

अहमदनगर (राहुरी) - राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा परिसरात असणा-या हॉटेल काका का ढाबा जवळ बिलाल युसुफ शेख वय-३५ या तरुणाचा मृतदेह स...


अहमदनगर (राहुरी) - राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा परिसरात असणा-या हॉटेल काका का ढाबा जवळ बिलाल युसुफ शेख वय-३५ या तरुणाचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडालीये.

सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह या परिसरात राहाणा-या लोकांनी पहिला असता त्यांनी  ताबडतोब राहुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली मिळालेल्या माहिती नुसार राहुरी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय चाचणीसाठी आणले.

बिलाल हा चारचाकी वाहनांच्या वायरिंगचे काम करत होता.बिलाल राहुरी शहरातील खुरपे मळ्यात राहत होता . अतिशय शांत स्वभावाचा असणा-या बिलाल चे कुणासोबातही भांडण नव्हते असे नातेवाईकांनी सांगितले. बिलाल रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडला होता .विशेष म्हणजे त्याला दुचाकी चालवता येत नव्हती मग तो एवढ्या लांब गेला कसा? त्याच्या गळ्यावर असणा-या जखमा कसल्या? याबाबत परिसरात उलटसुलट चर्चेला उधान आले असून नातेवाईकांनी हा घातपात असल्याची शंका व्यक्त केलीये.

मात्र मृताच्या गळ्यावर ओरखडल्याच्या खुणा असल्याने नातेवाईकांनी हा घातपात असल्याची शंका उपस्थित केलीये याबाबत राहुरीचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी अधिक माहिती दिलीये याबाबत राहुरी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार डी. बी. जाधव हे करीत आहेत.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: राहुरी तालुक्यात तरुणाचा मृतदेह... घातपाताची शक्यता
राहुरी तालुक्यात तरुणाचा मृतदेह... घातपाताची शक्यता
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgULiEOQ_glNQ4M_fzE7PmXAP07drfdusuNwikSzybe6xquovt7M5UBctsz0EnVlj9VVka_cX_mAnKCM24pXJNDwQo6_QTdA9SXXeVvSiNWFKz2J5vHl8-69rpvxDGQkx_6yst3ivoHVtGT/s320/04.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgULiEOQ_glNQ4M_fzE7PmXAP07drfdusuNwikSzybe6xquovt7M5UBctsz0EnVlj9VVka_cX_mAnKCM24pXJNDwQo6_QTdA9SXXeVvSiNWFKz2J5vHl8-69rpvxDGQkx_6yst3ivoHVtGT/s72-c/04.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_519.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_519.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago