नगर - आनंदऋषीजी हॉस्पिटल हे सर्वसामान्यांसाठी सतत 24 तास आरोग्य सेवेचा आधार देणारे रुग्णालय आहे. विविध शिबिराच्या माध्यमातुन सतत म...
नगर - आनंदऋषीजी हॉस्पिटल हे सर्वसामान्यांसाठी सतत 24 तास आरोग्य सेवेचा आधार देणारे रुग्णालय आहे. विविध शिबिराच्या माध्यमातुन सतत मिळणाऱ्या सेवेबरोबरच इतर वेळी ही गरजूंना सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा दिली जाते असे मत सहकार महर्षी सुवालाल गुंदेचा यांनी आनंदऋषीजी म.सा.यांच्या 24 व्या पुण्यस्मृतीनिमित्त नेवासा येथील धनराज हिरालाल गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने आयोजित शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा.यांच्या 24 व्या पुण्यस्मृतीनिमित्त नेवासा येथील धनराज हिरालाल गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने आयोजित अस्थिरोग, मणके व सांधे बदली तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन सुवालाल गुंदेचा यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाले. यावेळी ट्रस्टचे अशोक गुगळे, सुरेश मुनोत, सूर्यकांत गांधी, सुभाष पल्लोड, सतीश चुत्तर, सविताताई मुनोत, अनिल पितळे, प्रकाश भंडारी, राजेंद्र मुथा, कमलेश भंडारी, राजेश चंगेडिया, रसिकलाल मुनोत, मीनाताई मुनोत, सुभाषलाल मुथा, स्टेट बँकेचे रिजनल मॅनेजर बाबुलाल बंब, सीए असो.चे अध्यक्ष सीए सुशिल जैन, सीए प्रसाद भंडारी, सीए ज्ञानेश कुलकर्णी, सीए किरण भंडारी, सीए परेश बोरा, सीए सनित मुथा, सीए अजय मुथा, जैन ओस्तवाल पतसंस्थेचे अध्यक्ष शांतीलाल गुगळे, डॉ.वसंत कटारिया, डॉ.प्रकाश कांकरिया आदि उपस्थित होते.
शुक्रवार दि. 18 रोजी स्त्रीरोग, गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबिर होणार असून स्त्रीरोग तज्ञ डॉ.सौ.निर्लोफर धानोरकर व डॉ.रविंद्र मुथा रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. तरी गरजु रुग्णांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जैन सोशल फौंडेशनतर्फे करण्यात आले.









