नगर - सध्या उन्हाळा सुरु असून, पाण्यावाचून मोठे हाल होत आहेत. तहान लागल्यानंतर बिसलरी विकत घेण्याची गरज अनेकांना वाटते. शहरात विविध...
नगर - सध्या उन्हाळा सुरु असून, पाण्यावाचून मोठे हाल होत आहेत. तहान लागल्यानंतर बिसलरी विकत घेण्याची गरज अनेकांना वाटते. शहरात विविध ठिकाणी पाणपोई झाल्यास हा खर्च वाचू शकेल व लोकांची पाण्याची गरजही भागेल. या सर्व गोष्टींचा विचार करुन पितळे परिवाराने जारचे शुध्द पाणी नागरिकांना पिण्यासाठी पाणपोईद्वारे उपलब्ध करुन देऊन सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला आहे. असे प्रतिपादन पाणपोईच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना सुरेश जाधव यांनी यावेळी केले.
नवीन टिळक रोडवर स्व.शांतीलाल पितळे यांच्या स्मरणार्थ सुरु करण्यात आलेल्या पाणपोईचे उद्घाटन सुरेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अॅड.ललित गुंदेचा, अशोक कानडे, सुरेश खरपुडे, दत्ता जाधव, अमृत पितळे, मदन पितळे, ललित गुगळे, मयुर कटारिया, भारत गुरनानी, मनीष सोमाणी, महेंद्र सहदेव, ईश्वर बोरा, संतोष कासवा, कामरान अहमद, सचिन कटारिया, करण गांधी, हंसराज पटेल, अमित बोरा, सचिन भंडारी, राजेश सोमाणी आदी उपस्थित होते. अमृत पितळे म्हणाले की, सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम आम्ही राबविला आहे.










