नगर - सेंट्रल बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने रोजगार हमी योजनेवर काम करणार्या मजुरांना 6 दिवसाचे व्यवस...
नगर - सेंट्रल बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने रोजगार हमी योजनेवर काम करणार्या मजुरांना 6 दिवसाचे व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवून अर्थसाह्य केले जाईल, अशी माहिती सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे लिड डिस्ट्रिट मॅनेजर व्ही. टी. हुडे यांनी दिली.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीम रोजगार हमी योजनेंतर्गत नरेगा अंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. हुडे बोलत होते. यावेळी संस्थेचे संचालक बी. डी. शिरसाठ, बीडीओ रेश्मा होजगे, जिल्हा ग्रामीण विकासच्या मंजुषा धिवर, एस. डी. काळोखे आदी उपस्थित होते.










