नगर -चितळे रोड येथील हजरत सय्यद हैदरशाह उर्फ मिरावली बाबा दर्गाह ट्रस्टच्या अध्यक्षपदी हाजी अन्वर खान (पत्रकार) यांची, तर सेक्रेटरीपदी ...
नगर -चितळे रोड येथील हजरत सय्यद हैदरशाह उर्फ मिरावली बाबा दर्गाह ट्रस्टच्या अध्यक्षपदी हाजी अन्वर खान (पत्रकार) यांची, तर सेक्रेटरीपदी शेख रेहमान नूरमोहंमद व उपाध्यक्षपदी शेख अय्याज हुसेन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संस्थेला नुकतेच धर्मादाय आयुक्तांचे प्रमाणपत्र मिळाले आहे.
संस्थेची नवीन कार्यकारिणी अशी - अध्यक्ष हाजी अन्वर खान, सेक्रेटरी शेख रहेमान नूरमोहंमद, उपाध्यक्ष शेख अय्याज हुसेन, खजिनदार शेख जैबुनिसा रहेमान, सहसेक्रेटरी शेख जुबेदा हुसेन, कार्यकारिणी सदस्य शेख आर्सीफ रहेमान, शेख अनिस हुसेन, शेख एजाज रहेमान, शेख अजहर हुसेन, सय्यद शौकत नजीर, शेख अश्पाक (मुन्ना).
या निवडीबद्दल नूतन कार्यकारिणीचे शिवसेना उपनेते अनिल राठोड, नगरसेवक श्रीपाद छिंदम, नेहरू मार्केट मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष प्रदिपभैय्या परदेशी, माजी नगरसेवक धनंजय जाधव, सय्यद शमाभाई आदींनी अभिनंदन केले आहे.










