दि. 22 मार्च रोजी प्रशासन विभागाच्या मुख्य कार्य़ालयाने सादर केलेल्या परिपत्रकात शासनाच्या विविध योजना, धोरणे, कार्यक्रम, अधिकारी, कर...
दि. 22 मार्च रोजी प्रशासन विभागाच्या मुख्य कार्य़ालयाने सादर केलेल्या परिपत्रकात शासनाच्या विविध योजना, धोरणे, कार्यक्रम, अधिकारी, कर्मचारी, शासनाची कार्य़पध्दती इ. बाबत टीकात्मक किंवा नकारात्मक पध्दतीची बातमी कुठल्याही वृत्तपत्रात आली असेल तर त्या बातमी संबंधीचा वस्तुनिष्ठ असलेला खुलासा त्याचदिवशी दुपारपर्यंत संबंधित विभागाच्या सचिव, कार्यालय प्रमुख किंवा विभाग प्रमुखांनी संबंधित वृत्तपत्राकडे पाठवावा असे म्हटले आहे.
बातमी जर मुख्यमंत्र्यांची किंवा त्यांच्या खात्यातील संबंधित असेल तर खुलास्याचा मसुदा मुख्यमंत्री सचिवालयातील जनसंपर्क कक्षाके तात्काळ सादर करावा. या संदर्भात माहिती व जनसंपर्क महासंचनालयाचे महासंचालकांकडे समन्वय आणि संनियंत्रण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. महासंचालकांनी आपला अहवाल दर आठवड्याला मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांमार्फत मुख्यमंत्र्याकडे अवलोकनासाठी पाठवावा, असेही या परिपकात म्हटले आहे.
वृत्तपत्रातक सरकारविरोधी येणाऱ्या बातम्यांचा दररोज खुलासा करण्याचे काम आता संबंधित विभागांना करावे लागणार असल्याने बातमीची खातरजमा करणे हेच एक मोठे आव्हानही अधिकाऱ्यांसमोर राहणार आहे. उल्लेखनीय म्हणजे वृत्तपत्रांकडे पाठवलेला खुलासा संबंधित वृत्तपत्रांनी प्रसिध्द करावा किंवा नाही. याबाबत कोणताही उल्लेख या परिपत्रकात नाही. त्यामुळे खुलासा करण्याची केवळ औपचारिकताच संबंधित विभाग पूर्ण करतील, अशी वृत्तपत्र आणि शासकीय विभागात चर्चा आहे.










