राहुरी : तालूक्यातील वांबोरी येथे दिनांक 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी कारला मोटारसायकल आडवी घालून सिनेस्टाईल अंधाधुंद गोळीबार करीत दो...
राहुरी : तालूक्यातील वांबोरी येथे दिनांक 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी कारला मोटारसायकल आडवी घालून सिनेस्टाईल अंधाधुंद गोळीबार करीत दोघांनी कांदा व्यापार्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. या गोळीबारात एक व्यापारी जखमी झाला आहे. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडलेल्या या थराराने वांबोरीत दहशत पसरली असून तणावाचे वातावरण आहे.
याबाबत, संजय ऊर्फ कैलास नानासाहेब तोडमल, चंद्रकांत पारख, वसंतराव गव्हाणे, हे कांदा व्यापारी अक्षय मुथ्था यांच्या फोर्ड कंपनीच्या गाडी क्रमांक एम. एच. 17 ए जे 8586 मधून दिनांक 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास राहुरी येथील अॅक्सीस बॅक मधून रोख रक्कम घेऊन जात असतांना वांबोरी ते पांढरी पूल जाणार्या रोडवर पाठीमागून विना क्रमांकाच्या मोटरसायकलवर आलेल्या दोघा भामट्यांनी व्यापार्यांच्या गाडीला मोटरसायकलवर आडवी घालून अडविले. व्यापार्यांबरोबर झटापट करून रोख रक्कम हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी भामट्यांनी आपल्या जवळील रिव्हॉलवरमधून चार वेळा व्यापारी व त्यांच्या गाडीवर फायर केले. सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही. यावेळी भामटे रोख रक्कम हिसकावून घेण्यात अपयशी झाल्याने त्यांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. या घटनेत संजय ऊर्फ कैलास नानासाहेब तोडमल वय 27 वर्षे हे जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजले. याबाबत तोडमल यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत गुन्हा रजि. नंबर 80/2016 भादंवि कलम 307, 393, 341, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पूढील तपास पो. नि. संजय पाटील हे करीत आहे.










