अहमदनगर - डॉ. मुहंमद आझम यांच्या सद्गंधा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या सुफी तत्वज्ञान ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचे स्वागत पहिल्या का...
अहमदनगर - डॉ. मुहंमद आझम यांच्या सद्गंधा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या सुफी तत्वज्ञान ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचे स्वागत पहिल्या कार्यक्रमात करण्यात आले. या पहिल्या परिसंवादात प्रेम या तत्वसूत्रावर विशेष चर्चा झाली. डॉ. नेल्सन फलकाव यांनी
ख्रिस्तपुराण या ग्रंथाच्या आधारे प्रेमसेवा विषयक विवेचन केले. आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टतर्फे तत्व समन्वय परिसंवाद उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दर महिन्याला विशिष्ट धर्म तत्वज्ञानावर हे चर्चासत्र होते. फादर डॉ. नेल्सन फलकाव यांच्या कल्पनेतून हा उपक्रम साकारला जात आहे. डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी भक्ती प्रेमरुपा या सूत्राच्या आधारे नारदीयभक्ती सूत्रे या अनुषंगाने मत नोंदविले. अशोक कर्डिले महाराज यांनी नाथ तत्वज्ञानातील स्वसंचेती आणि भागवत संप्रदायातील भक्तीविषयक श्री ज्ञानेश्वरांचे विचार विशद केले. या उपक्रमांतर्गत सर्वधर्मसमभाव, धर्मातील मानवता वाद, धर्मातील आस्तिकभक्तांचा विचार आदी विषयांवर हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, धर्मांसह शीख, बौद्ध, जैन धर्म तत्वज्ञानावर चर्चा व्हावी, असा मानस आहे. डॉ. सहस्त्रबुदद्धे यांनी स्वागत केले. तसेच या उपक्रमातील सहभागी होणार्या व्यक्तींना अधिकाधिक संधी देण्याविषयी चर्चा केली.










