नेवासा - नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती,उपसभापती,सचिवासह ६ जणांविरुध्द नेवासा पोलीस ठाण्यात एका व्यापार्याने चोरीचा गुन्...
नेवासा - नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती,उपसभापती,सचिवासह ६ जणांविरुध्द नेवासा पोलीस ठाण्यात एका व्यापार्याने चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी नेवासा बाजार समितीमध्ये आडत व्यापारी देविदास सदाशिव साळुंके यांचे सुभाष प्रकाश अँण्ड कंपनी नावाचे आडत दुकान आहे. त्यांच्या दुकानातील शेतीमाल चोरी झाल्या प्रकरणी त्यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दि.२९ रोजी फिर्याद दिली आहे.फिर्यादित म्हटले आहे की, कृषी उत्पन्न बाजार समितीचे कडुबाळ बाबुराव कर्डिले, वसंतराव भाऊससाहेब देशमुख, श्रीरंग आसराजी हारदे, शंकर मुरलीधर लोखंडे, रमेश भाऊराव मोटे, सचिव पालवे या सहा जणांनी २८ ते २९ फेब्रुवारी दरम्यान रात्री आपल्या आडत दुकानातील पडवीतील शेतीमाल चोरून नेला. तसेच या मालास स्वत:च्या नावाने सील लावले. याबाबत सचिव पालवे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आपणास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. नेवासा पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला असून पो.नि.अनिल लंभाते यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश जांभळे हे पुढील तपास करीत आहेत.










