अहमदनगर - कर्नाटक मधील बेळगाव येथे झालेल्या स्केटींग क्रीडा स्पर्धेत अहमदनगरमधील आवेज आसिफ शेख व आदिश पंकज दाभाडे या दोन स्केटर खेळ...
अहमदनगर - कर्नाटक मधील बेळगाव येथे झालेल्या स्केटींग क्रीडा स्पर्धेत अहमदनगरमधील आवेज आसिफ शेख व आदिश पंकज दाभाडे या दोन स्केटर खेळाडूंनी स्केटिंग क्रिडेमध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदविणारे अहमदनगर जिल्ह्यातील हे प्रथमच दोन खेळाडू आहेत.
अहमदनगर येथे राष्ट्रीय दर्जाचे स्केटींग क्रिडांगण उपलब्ध नसतांनाही केवळ उत्तम मार्गदर्शनामुळे अहमदनगर येथील आवेज शेख व आदिश दाभाडे या दोन विद्यार्थ्यांनी गिनीज बुक ऑप रेकॉर्डमध्ये विक्रमी नोंद करुन उत्कृष्ट कामगिरी केली. पैकी आवेज आसिफ शेख हा व्ही.आर.डी.ई चा विद्यार्थी असून त्याने 121 तास रिले मॅरेथॉन मध्ये 3,150 किलोमीटर अतंर पार करण्याचा विक्रम केला आहे. तसेच त्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड व इंडियन अचिव्हर्स बुक ऑफ रेकॉर्ड यामध्येही नोंद झालेली आहे. आवेज शेख याला विविध स्केटींग स्पर्धांमध्ये एकूण 12 सुवर्ण, 7 रौप्य व 4 कास्य पदके मिळालेली आहेत. तर आदिश दाभाडे हा इंडस वर्ल्ड स्कूलचा विद्यार्थी असून विविध स्पर्धांमध्ये यानेही विविध पदके मिळवून नेत्रदिपक कामगिरी केली आहे. हे दोघेही टिम स्केटींग अॅकॅडमीचे खेळाडू आहेत.
त्यांच्या या कामगिरीबद्दल शहरातील विविध स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. मा.प्रशांतभाऊ गडाख, मा.गणेशजी भोसले, केंद्रीय विद्यालयाच्या प्राचार्या सौ.यादव, प्रा.पवार तसेच टिम टॉपर्स अॅकेडमीचे प्रशिक्षक प्रशांत पाटोळे, सागर भिंगारदिवे, अॅड.महेश शिंदे, सागर कुक्कडवाल, अंकुश नागर, अनुप गुंदेचा, मनोज काथेड, सादीक मुल्ला यांनी दोघांचे सत्कार केले.










