अहमदनगर - माजी मंत्री शिवसेना उपनेते मा.आमदार अनिल भैय्या राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त केडगाव, भूषणनगर परिसरातील स्वामी विवेकानंद च...
अहमदनगर - माजी मंत्री शिवसेना उपनेते मा.आमदार अनिल भैय्या राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त केडगाव, भूषणनगर परिसरातील स्वामी विवेकानंद चौक येथे हरिहरेश्वर प्रतिष्ठाण व जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक, अपंग, अनाथ, निराधार मंचाच्या वतीने स्त्रीरोग व बालरोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.
शिबीराचे प्रमुख पाहुणे म्हणून सुरेशराव दहिफळे, संपतराव पालवे, अॅड.मनोजराव कडुपाटील, शंकरराव हराळ, किसनराव भापकर, संगिताताई साबळे आदि मान्यवर उपस्थित होते. प्रथम सिध्दीविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ.रामदास बांगर (बालरोग तज्ञ), मातृसेवा स्त्रीरुग्णालयाच्या संचालिका स्त्रीरोग तत्र डॉ.सारिका बांगर, प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ.चेमटे श्रीकांत व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करुन शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. तसेच सर्व प्रमुख पाहुण्यांच्या व डॉ.बांगर रामदास बालरोग तज्ञ व डॉ.बांगर सारिका स्त्रीरोग तज्ञ यांचा प्रतिष्ठाणच्या वतीने गौरव करण्यात आला.









