Archive Pages Design$type=blogging

महिला आरक्षण विधेयक मंजुरीची मागणी

अहमदनगर - लोकसभेत मंजूर झालेले महिला आरक्षण विधेयक राज्यसभेतही मंजूर करून देशातील लोकप्रतिनिधींनी जागतिक महिला दिनाची अपूर्व भेट देशा...



अहमदनगर - लोकसभेत मंजूर झालेले महिला आरक्षण विधेयक राज्यसभेतही मंजूर करून देशातील लोकप्रतिनिधींनी जागतिक महिला दिनाची अपूर्व भेट देशातील समस्त महिलावर्गाला द्यावी, असे आवाहन मानवाधिकार जनआंदोलन संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्ष संध्या मेढे यांनी केले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, लोकसभा अध्यक्षा खा. सुमित्रा महाजन यांनी राष्ट्र उभारणीत महिला लोकप्रतिनिधींची भूमिका या विषयावर राष्ट्रीय परिषद नुकतीच दिल्लीत आयोजित केली होती. या राष्ट्रीय परिषदेत संबोधित करताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही संसदेत व विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणार्‍या विधेयकाचे पुनरुज्जीवन झाले पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडली आहे. महिलांच्या आरक्षणाबद्दल गप्पा करणार्‍या सर्व राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधींवर आता याची जबाबदारी आली आहे. कारण यूपीए सरकारने दोन तृतियांश मताधिक्क्याने लोकसभेत हे विधेयक यापूर्वीच मंजूर केले आहे. आता ते राज्यसभेनेही मंजूर केले तर देशातील समस्त महिला वर्गाला न्याय मिळू शकेल.

२0१४ च्या लोकसभा निवडणुकीतील आकडेवारी पाहता सर्व राजकीय पक्षांनी केवळ १४६ महिलांना उमेदवारी दिली होती. एकूण १५९१ उमेवारांमध्ये हे प्रमाण फक्त ९.१७ एवढेच आहे. अद्यापही २२ टक्के प्रतिनिधीत्व कमी आहे. महिलांच्या या राष्ट्रीय परिषदेसाठी सर्वपक्षीय २६२ महिला आमदार, दोन्ही सभागृहांच्या ९६ महिला खासदार उपस्थित होत्या. याशिवाय देशातील पंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १२ लाख ७0 हजार महिला लोकप्रतिनिधी म्हणून चांगली कामगिरी बजावत आहेत. महिलांना ३३ टक्के आरक्षण ही काळाची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी सर्वपक्षीय महिला कार्यकर्त्या व सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या महिलांचे एकत्रित व्यासपीठ यानिमित्ताने महाराष्ट्रात उभे करण्याचा मनोदयही महिला दिनाच्या निमित्ताने व्यक्त केला आहे.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: महिला आरक्षण विधेयक मंजुरीची मागणी
महिला आरक्षण विधेयक मंजुरीची मागणी
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgULiEOQ_glNQ4M_fzE7PmXAP07drfdusuNwikSzybe6xquovt7M5UBctsz0EnVlj9VVka_cX_mAnKCM24pXJNDwQo6_QTdA9SXXeVvSiNWFKz2J5vHl8-69rpvxDGQkx_6yst3ivoHVtGT/s320/04.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgULiEOQ_glNQ4M_fzE7PmXAP07drfdusuNwikSzybe6xquovt7M5UBctsz0EnVlj9VVka_cX_mAnKCM24pXJNDwQo6_QTdA9SXXeVvSiNWFKz2J5vHl8-69rpvxDGQkx_6yst3ivoHVtGT/s72-c/04.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_566.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_566.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago