नगर - 3 मुलींच्या जन्मानंतरही मुलाची अपेक्षा न करता मुलींनाच मुलांप्रमाणे संगोपन करीत असतांना पत्नीचे निधन झाले. त्यानंतर 2 रे लग्न...
नगर - 3 मुलींच्या जन्मानंतरही मुलाची अपेक्षा न करता मुलींनाच मुलांप्रमाणे संगोपन करीत असतांना पत्नीचे निधन झाले. त्यानंतर 2 रे लग्न न करता वडीलांनीच आईची भूमिका पार पाडीत 3 चिमुकल्यांना आपल्या म्हातारपणीची काठी समजून त्यांना चांगले शिक्षण दिले. संस्काराची शिदोरी देत लग्न करुन कन्यादानाचे पवित्र कार्यही पार पाडले. एकटेपण काढीत शेतीशी मैत्री करीत उदरनिर्वाह करणारे देवराम नाना रोकडे, हे त्या मुलीचे वडील यांचे वयाच्या 85 व्या वर्षी वृध्दापकाळाने 11 मार्च रोजी निधन झाले. पळशी (पारनेर) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उषा, आशा, सुनिता या तिन्ही मुलींनी वडिलांचे अंत्यसंस्कार करुन त्यांच्या पार्थिव देहाला अग्नी दिला.
रोकडे हे पारनेर तालुक्यातील कर्जुले हरेश्वर या गावातील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांच्या मागे तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.










