अहमदनगर : आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करून स्वत:ला सिध्द करत आहेत. अशा परिस्थितीत समाजात स्त्री जन्म दराचे ...
अहमदनगर : आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करून स्वत:ला सिध्द करत आहेत. अशा परिस्थितीत समाजात स्त्री जन्म दराचे घटते प्रमाण चिंताजनक बाब आहे. समाजाने मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून स्त्री जन्माचे स्वागत करायला हवे. याशिवाय मुलींना चांगले शिक्षण देवून त्यांना स्वत:चे कर्तृत्व सिध्द करण्यासाठी प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जि.प.महिला व बालकल्याण समिती सभापती नंदा वारे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्यावतीने बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे आयोजित कन्यारत्न उत्सव कार्यक्रमात सभापती वारे बोलत होत्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन लहान मुलीच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी जि.प.सदस्य दत्तात्रय सदाफुले, सरपंच अर्चना चौधरी, उपसरपंच शरद पवार, प्रवीण कोकाटे, ग्रामविकास अधिकारी एन.ए.वाळके, अजय बोरूडे, लिला हजारे, भाग्यश्री पठारे आदी उपस्थित होते.









