नगर- प्रभाग क्र.2 हा सर्वात मोठा वॉर्ड असल्याने दोन नगरसेवक नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात मग्न असतात. प्रत्येक भागाला न्याय देण्याचा...
नगर- प्रभाग क्र.2 हा सर्वात मोठा वॉर्ड असल्याने दोन नगरसेवक नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात मग्न असतात. प्रत्येक भागाला न्याय देण्याचा प्रयत्नअसतो. एक सत्ताधारी पक्षाचा, एक विरोधी पक्षाचा नगरसेवक असला तरी मनपाच्या माध्यमातून दोन्ही नगरसेवक नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देत आहोत, असे प्रतिपादन माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केले.
निर्मलनगर येथील वरदविनायक अपार्टमेंट ते छत्रपती चौक अशा रोडलगतच्या ड्रेनेज कामाचा शुभारंभ र्श्रीेंळ वाढवून श्री.वारे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, मनपाच्या निधीतून, नगरसेवकांच्या स्वखर्चातून सध्या लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न असतो. आता स्थानिक नागरिकही सांडपाण्यासारख्या महत्वाचा प्रश्न लोकवर्गतीतून सोडविण्यास पुढे येतात ही चांगली गोष्ट आहे. नागरिकांचे तशी तयारी असल्याचे चित्र सर्वत्र दिसते, असे श्री.वारे म्हणाले.
यावेळी डॉ.एस.के.ताजवे, विक्रम चोभे, महादेव गरड, कैलास बनकर, बाळासाहेब कोळी, परेश शिरुडे, रमेश यादव, रमिज शेख, भोर, खेडकर, महापुरे, नागरीक उपस्थित होते.









