महिला दिनीच मानाचे स्थान न राहता कायम स्वरुपी रहावे - अॅड.शारदा लगड नगर- जोपर्यंत पुरुष प्रधान संस्कृती बदलत नाही, तोपर्यंत महिलां...
महिला दिनीच मानाचे स्थान न राहता कायम स्वरुपी रहावे - अॅड.शारदा लगड
नगर- जोपर्यंत पुरुष प्रधान संस्कृती बदलत नाही, तोपर्यंत महिलांचा सर्वांगिण विकास शय नाही. जी महिला सर्व कुटूंबाचा भार सांभाळते, त्या महिलेला फक्त जागतिक महिला दिनीच मानाचा स्थान न राहता कायम स्वरुपी 365 दिवस तिचा मान-सन्मान झाला पाहिजे, तरच खर्या अर्थाने जागतिक महिला दिन साजरा झाल्याचे निष्पन्न होईल, असे प्रतिपादन ऍड.शारदा लगड यांनी केले.
एकात्मिक बाल विकास प्रकल्प नागरी-1 व 2 च्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त ‘आदर्श अंगणवाडी’ पुरस्कार व महिला मेळाव्याचे उद्घाटन ऍड.शारदा लगड यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई र्ेंुले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. याप्रसंगी सारडा महाविद्यालयाच्या प्रा.रत्ना वाघमारे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा पवार आदि मान्यवर उपस्थित होते.









