शुक्रवार दि. 11 मार्च रोजी अहमदनगर जिल्हा असोसिएशनची बैठक अध्यक्ष मोहनराव कापसे यांचे अध्यक्षतेखाली सर्व श्रमिक संघ कार्यालय, अ.नगर ...
शुक्रवार दि. 11 मार्च रोजी अहमदनगर जिल्हा असोसिएशनची बैठक अध्यक्ष मोहनराव कापसे यांचे अध्यक्षतेखाली सर्व श्रमिक संघ कार्यालय, अ.नगर येथे आय़ोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व साखर, विडी, एस.टी., वीज, महामंडळ, शेती महामंडळ व सहकारी बँकेचे प्रतिनिधी, सुभाष कुलकर्णी, कॉ.आनंदराव वायकर, पोखऱकर, रमेश गवळी, केंद्रे, दहीफळे व इतर बैठकीसाठी हजर होते. यावेळी श्री.पोखरकर यांनी रविवार दि.21 फेब्रु. 2016 रोजी नांदेड येथे झालेल्या महाराष्ट्र पेन्शन असो.च्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयाची माहिती सर्वांना देण्यात आली. मा.ना.कोशियारी समितीच्या अहवालातील शिफारसी असे कमीत कमी 3000/- पेन्शन, पेन्शनचा महागाई भत्त्याशी संबंध, दर तीन वर्षांनी पेन्शनबाबत आढावा वगैरे. इतर मागण्यांसाठी केंद्रसरकारने दिलेल्या आश्वासनांची त्वरीत अंमलबजावणी करण्यासाठी नवी दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर दि. 25 ते 29 एप्रिल 2016 या कालावधीमध्ये धरणे धऱण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. संपुर्ण देशातील इ.पी.एस. 95 अंतर्गत येणारे असंख्य कामगार या धरणे धऱण्याच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी सर्व सभासदांनी त्वरीत रेल्वे आरक्षणाचे तिकीट काढून सुभाष कुलकर्णी यांचेकडे त्वरीत माहिती द्यावी. साखर व शेती धऱण्याचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हजर रहावे असे आवाहन केले.तसेच कॉ.आनंदराव वायकर, केंद्रे, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे सेवानिवृत्त अधइकारी दहीफळे यांनी निवृत्त कामगार मोठ्या संख्येने हजर रहावे असे आवाहन केले.
रमेश गवळी यांनी 19/12/2015 रोजी हैद्राबाद येथे अखिल भारतीय पेन्शन असो.च्या बैठकीतील निर्णय व दि. 21/02/2016 रोजी नांदेड येथे झालेल्या अखिल महाराष्ट्रीय पेन्शन असो व सर्व महाराष्ट्र श्रमिक संघाच्या आवाहनानुसार नगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी भाग घ्यावा असे आवाहन व माहिती महाराष्ट्र पेन्शन असो.चे सदस्य रमेश गवळी यांनी केले.










