पिंपळगाव जोगा धरणातून आवर्तन सुटल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा पारनेर तालुक्यातील अळकुटी भागात पाणी आले. आता या भागातील अठरा पाझर त...
पिंपळगाव जोगा धरणातून आवर्तन सुटल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा पारनेर तालुक्यातील अळकुटी भागात पाणी आले. आता या भागातील अठरा पाझर तलाव भरले जाणार असून लोणी मावळा, पारनेर साखर कारखाना परिसर, देवीभोयरे फाटा येथील मोठे साठवण तलाव भरले जाणार आहेत. यामुळे या तलावांशेजारील गावांच्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार आहे. पिंपळगाव जोगात फक्त अर्धा टी.एम.सी. पाणी शिल्लक असून आवर्तन पुन्हा सुटणार नसल्याने पाणी जपून वापरावे.
-डॉ.भास्कर शिरोळे, अध्यक्ष, पिंपळगाव जोगा कृती समिती पारनेर : पिंपळगाव जोगाचे आवर्तन गुरूवारी रात्री उशिरा सुटल्याने पारनेर तालुक्यातील अळकुटीसह शेजारील गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या नळ योजना सुरू होणार आहेत. त्यामुळे शासनाचा या गावांवरील टँकरचा लाखो रूपयांचा खर्च वाचणार आहे. पंधरा दिवस हे आवर्तन सुरू राहणार आहे.
अकुटीसह कळस, रांधे, पाडळी आळे, दरोडी, लोणीमावळा,बाभुळवाडे, वडझिरे, देवीभोयरेसह परिसरातील गावांमध्ये यंदा कमी पावसामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. येथील वाड्या वस्त्या पाण्यावाचून तहानल्या आहेत. यातील काही ठिकाणी टँकरचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
पिंपळगावजोगाचे आवर्तन सुटल्यास या भागातील नळयोजना कार्यान्वित होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो, असा मुद्दा पंचायत समिती सदस्य व पिंपळगाव जोगा कृती समितीचे अध्यक्ष डॉ.भास्कर शिरोळे यांच्यासह सदस्यांनी वरीष्ठ अधिकार्यांसमोर मांडला होता. मुंबई येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतही हा प्रश्न मांडण्यात आला होता. बैठकीनंतर गुरूवारी रात्री पारनेर तालुक्यासाठी पिंपळगाव जोगाचे आवर्तन सोडण्यात आल्याचे डॉ.शिरोळे यांनी सांगितले.










